Loksabha Election Opinion Poll Sarkarnama
मुंबई

Loksabha Election 2024 : आज लोकसभेची निवडणूक झाली तर महाराष्ट्रात कुणाला किती जागा? ताजा सर्व्हे काय सांगतो?

Loksabha Election Opinion Poll : सर्वाधिक जागा भाजपला, त्या पाठोपाठ उद्धव ठाकरेंना..

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra News : लोकसभा निवडणुकीसाठी वर्षभरापेक्षाही कमी कालावधी राहिला आहे. याच अनुषंगाने सर्वच पक्ष तयार लागले आहेत. काँग्रेसप्रणित आघाडीने 'यूपीए' ऐवजी 'इंडिया' असे नामकरण केले आहे. या सर्व घडामोडीत एक ताजा लोकसभा निवडणूक सर्व्हेची आकडेवारी समोर आवी आहे. आजच लोकसभा निवडणूक झाली तर विविध राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील? याबाबत सर्व्हेतून अंदाज घेण्यात आला आहे.

'इंडिया टीव्ही-सीएनएक्स' या संस्थेने केलेल्या एका ओपिनियन पोलमधून आज लोकसभा निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याबाबत सर्व्हे करण्यात आला. यानुसार महाराष्ट्रातील ४८ जागांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे

इंडिया टीव्ही ओपिनियन पोलमध्ये महाराष्ट्रातील लोकसभांच्या जागांवर केलेल्या सर्व्हे नुसार सर्वाधिक जागा भाजपला मिळणार असल्याचे सांगितले आहे. तर त्या खालोखाल सर्वाधिक जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळतील असा अंदाज आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केवळ दोनच जागा मिळण्याचा निष्कर्ष सांगण्यात आले.

महाराष्ट्रात कुणाला किती जागा?

महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या 48 जागांपैकी भाजपला 20, काँग्रेसला 9, शिवसेना शिंदे गटाला 2, शिवसेना ठाकरे गटाला 11, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 2, राष्ट्रवादी शरद गटाला 4 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT