Loksabha Election 2024 : लोकसभेला उत्तर प्रदेशात भाजपला किती जागा? ताज्या सर्व्हेतून आली आश्चर्यकारक आकडेवारी !

Loksabha Election Opinion Poll : भाजपला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज..
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024 Sarkarnama
Published on
Updated on

National News : लोकसभा निवडणुकीसाठी वर्षभरापेक्षाही कमी कालावधी राहिला आहे. याच अनुषंगाने सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. काँग्रेसप्रणित आघाडीने 'यूपीए' ऐवजी 'इंडिया' असे नामकरण केले आहे. एकीकडे सर्वच पक्षांची लगबग सुरू असताना एका ओपिनिअन पोलची आकडेवारी समोर आली आहे. आजच लोकसभा निवडणूक झाली तर विविध राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील? याबाबत सर्व्हेतून आश्चर्यकारक दावे केले आहेत. (Latest Marathi News)

Loksabha Election 2024
Sharad Pawar Visit PM Modi : शरद पवार हे मोदींसाठी पुण्यात थांबणार की केजरीवालांची विंनती मानणार ?

'इंडिया टीव्ही-सीएनएक्स' या संस्थेने केलेल्या एका ओपिनियन पोलमधून भाजपला उत्तर प्रदेशात मोठा विजय मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र यावेळीही मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाला फटका बसण्याची आणि समाजवादी पार्टीला २०१९ च्या तुलनेत २०२४ च्या काही अंशी दिलासा मिळणार, असा दावा या सर्व्हेतून करण्यात आले आहे.

ओपिनियन पोलनुसार, उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या 80 जागांपैकी जास्तीत जास्त 70 जागा भाजपला मिळणार असल्याचा अंदाज या सर्व्हेतून सांगण्यात आले आहे. तर चार जागा सपाला, दोन जागा काँग्रेसला, दोन अपना दल या स्थानिका पक्षाला, एक जागा राजभर यांच्या पक्षाला आणि एक जागा आरएलडीला मिळू शकते.

Loksabha Election 2024
Uddhav Thackeray News : ठाकरे गटाची गळती थांबेना; बीएमसी निवडणुकीआधी 'जोर का झटका'!

या सर्व्हेत बसपा खातंही खोलणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 80 पैकी 62 जागा जिंकल्या होत्या. यामध्ये एनडीएचा मित्रपक्ष अपना दल (एस) च्या खात्यातही दोन जागा आल्या होत्या. सर्वेक्षणातील आकडेवारीवरिच्या दाव्यानुसार ही निवडणूक बसपासाठी अत्यंत कठीण असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com