Karnataka Politics News: ना भाजप, ना काँग्रेस; लोकसभा निवडणूक स्बळावर लढणार; जेडीएसने केले स्पष्ट

Congress News : कुमारस्वामी यांच्या वक्तव्यामुळे निवडणुकीसाठी जेडीएस आणि भाजप हातमिळवणी करतील, अशी अटकळ बांधली जात होती.
hd deve gowda
hd deve gowda Sarkarnama
Published on: 
Updated on: 

HD Deve Gowda News : लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाशी आघाडी करणार नसल्याचे माजी पंतप्रधान व जेडीएसचे प्रमुख एचडी देवेगौडा यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या (Congress) विरोधात भाजप आणि जेडीएस एकत्र लढणार असल्याची चर्चा होती. मात्र, देवेगौडा यांनी या सगळ्या शक्यता फेटाळून लावल्या.

कर्नाटच्या (Karnataka) निवडणुकीमध्ये काँग्रेसने ऐतिहासीक विजय मिळवला. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जेडीएसला मोठा फटका बसला. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजप (BJP) आणि जेडीएस एकत्र येत काँग्रेससमोर आव्हान निर्माण करेल, अशी शक्यता होती. कारण माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी गेल्या आठवड्यात विविध मुद्द्यांवर काँग्रेस सरकारच्या विरोधात भाजपसोबत काम करू असे स्पष्ट केले होते.

hd deve gowda
MLA Ashwini Jagtap In Assembly: चिंचवडच्या नव्या आमदार अश्विनी जगतापांची विधानसभेत जोरदार बॅटिंग

कुमारस्वामी यांच्या वक्तव्यामुळे निवडणुकीसाठी जेडीएस आणि भाजप हातमिळवणी करतील, अशी अटकळ बांधली जात होती. 'इंडिया' किंवा 'एनडीए' अशा कोणत्याही आघाडीत सहभागी होणार नसल्याचे देवेगौडा यांनी सांगितले. आम्ही चार पाच किंवा सहा जागा जिंकू, पण आम्ही एकटेच लढू, असे त्यांनी स्पष्ट केले. जेडीएस लोकसभा निवडणुकीत फक्त त्या भागातच उमेदवार उभे करेल, जिथे पक्ष मजबूत आहे.

hd deve gowda
Ambadas Danve News : पुरवणी मागण्या विकासासाठी नव्हे, तर पक्षांतर केलेल्या आमदारांसाठी..

अगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप आणि काँग्रेससह विरोधी पक्ष रणनीती आखत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएच्या घटक पक्षांची बैठक दिल्लीमध्ये झाली. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली बैगळुरुमध्ये 'इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायंस' (इंडिया) विरोधी पक्षांची बैठक पार पडली. या दोन्ही बैठकींना जेडीएसच्या नेत्यांनी हजेरी लावली नव्हती. त्यामुळे ते कोणत्या आघाडीत जाणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, त्या संदर्भात देवेगौडा यांनी स्व:ताच स्पष्टीकरण दिले.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com