Sanjay kute Pankaja Munde Sarkarnama
मुंबई

"लोकांनी नेतृत्व स्विकारलं तर तो वंशवाद ठरत नाही" : भाजप आमदाराचे वक्तव्य!

Pankaja Munde : "विशिष्ट धर्मावर टिका करून दाखवा मग कळेल की धड तन से अलग कैसे होता है."

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankja Munde) यांच्या यांनी वंशवादाचे राजकारण व त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. पंकजाच्या वक्तव्याने भाजपमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. यावर आता भाजपचे आमदार संजय कुटे (Sanjay Kute) यांनी वेगळी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पंकजांच्या मनात मोदींविषयी तसे काही नाही. ओघाने त्या बोलल्या असाव्यात, असे कुटे म्हणाले.

वंशवादी राजकारणाच्या उपस्थित झालेल्या मुद्द्यावर बोलताना कुटे म्हणाले की, जर लोकांनी नेतृत्व स्वीकारलं तर तो वंशवाद होत नाही. दरम्यान "मी सुद्धा वंशवादाचे प्रतीक आहे. मला कोणीही संपवू शकत नाही. नरेंद्र मोदी यांनी सुद्धा ठरवून मला संपवायचा प्रयत्न केला तर ते सुद्धा मला संपवू शकत नाहीत. कारण मी तुमच्या मनावर राज्य केले, पंकजा यांनी म्हंटले होते.

यावेळी कुटे यांनी मंत्रालयात लावलेले गाडगेबाबा यांच्या दशसूत्री हटवल्याच्या मुद्द्यावर भाष्य केले. कालच्या सामना वर्तमानपत्रात आमचे विदर्भातील महान संत गाडगेबाबा बद्दल लेख छापण्यात आला. संत गाडगेबाबा राज्याला प्रेरणा देणारे थोर पुरुष आहेत. मंत्रालयात दशसूत्री लावली होती. तिथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव होते. पण आता ते मुख्यमंत्री नाहीत. त्यामुळे त्यांचे नाव काढले आहे. उद्या पुन्हा दशसुत्री लावली जाईल, फक्त उद्धव ठाकरे यांचे नाव त्यातून काढले आहे, असे कुटे म्हणाले.

प्रहार संघटनेचे प्रमुख व आमदार बच्चू कडू यांनी आपल्या कार्यकर्त्यावर हात उगारले होते. भविष्यात असे कृत्य त्यांच्याकडून होणार नाही, याची ते काळजी घेतील, असे कुटे म्हणाले.

राष्ट्रवीदीचे नेते छगन भुजबळ यांनी सरस्वती देवीबद्दल केलेल्या वक्तव्यालाही त्यांनी उत्तर दिले. भुजबळ यांच्याकडून आम्हाला अशी अपेक्षा नव्हती. पण त्यांचे कालचे वक्तव्य निंदनिय आहे. शारदा देवी विद्येच्या देवता आहेत. कदाचिच ते भुजबळ यांचे वाक्य नसेल, त्यांना तसे बोलायला लावले असेल. हिंदुबद्दल इतका द्वेष करणे योग्य नाही. एका विशिष्ट धर्मावर टिका करून दाखवा मग कळेल की धड तन से अलग कैसे होता है. भुजबळ यांनी त्यांच्या वक्तव्याबाबत माफी मागावी, असेही कुटे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT