BJP, Congress Sarkarnama
मुंबई

Congress Party Bhiwandi : काँग्रेसच्या बैठकीला भाजप खासदाराने केला खर्च ?

Union Minister Kapil Patil : राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा दावा मोडून काढण्यासाठी केंद्रीयमंत्री कपिल पाटील यांचा प्रयत्न.

Bhagyashree Pradhan

Congress Party Bhiwandi : लोकसभा निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांची तयारी सुरू झाली आहे. महविकास आघाडी आणि महायुतीमध्ये प्रत्येक पक्ष आपल्याला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर भिवंडी येथे काँग्रेसची कोकण विभाग जिल्हानिहाय बैठक झाली. या बैठकीचा खर्च भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी केल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादीकडून सुरेश म्हात्रे म्हणजेच बाळामामा उभे राहणार आहेत, अशी चर्चा सुरू झाली आणि कपिल पाटील यांना आपल्यासमोर तोडीस तोड दावेदार असल्याचे समजले. म्हणूनच काँग्रेसने ही जागा मागून घ्यावी आणि आपल्यावरील दडपण कमी व्हावे, यासाठी त्यांनी ही खेळी केली का ? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

सुरेश म्हात्रेचे कपिल पाटील यांना आव्हान...

सुरेश म्हात्रे यांनी 2014 ला मनसेकडून उमेदवारी घेत कपिल पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवत तब्बल सव्वा लाखाच्या आसपास मते घेतली होती. त्यानंतर म्हात्रे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आणि काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर म्हात्रे यांच्यावर भिवंडी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली. राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत म्हात्रे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसचा दावा...

2009 मध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघ वेगळा करण्यात आला. सुरुवातीला भिवंडी लोकसभेत काँग्रेसचे वर्चस्व पाहायला मिळाले. 2009 ते 2014 या कालावधीत तेथे काँग्रेसचे सुरेश तावरे खासदार होते. त्यानंतर 2014 ते 2019 या कालावधीत भाजपचे कपिल पाटील खासदार झाले. त्यानंतर पुन्हा कपिल पाटीलच खासदार म्हणून निवडून आले. म्हणून काल झालेल्या भिवंडीतील मेळाव्यात या मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला आहे. यापूर्वी या लोकसभा मतदारसंघातून आमचा उमेदवार निवडून आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मंत्री पाटील यांनी काँग्रेस मेळाव्यासाठी मदत केली? चर्चेला उधाण

काँग्रेसचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाधिकारी दयानंद चोरघे हे सुरुवातीला भाजपमध्ये होते. त्यांचे आणि खासदार केंद्रीयमंत्री कापिल पाटील यांचे चांगले संबंध होते. मात्र काही व्यावसायिक कारणांनतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे बोलले जाते.

त्यामुळे आजही काँग्रेसचे पदाधिकारी असणारे दयानंद चोरघे आणि पाटील यांच्यात चांगले बोलणे आहे का आणि त्यामुळे चोरघे यांनी काँग्रेसची बैठक भरवण्यासाठीच पाटील यांची मदत घेतली का ? अशा अनेक प्रश्नांना उधाण आले आहे. या बैठकीसाठी भिवंडीजवळील संपूर्ण वाटिका हॉटेल काँग्रेसने बुक केले होते. त्यामुळे काँग्रेसच्या या सभेला मंत्री कपिल पाटील यांनी पूर्ण सहकार्य केले का ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

(Edited by Amol Sutar)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT