Raj Thackeray News : दोन्ही ठाकरेंची नजर नाशिकवर; आता राजही चार दिवस ठोकणार तळ

Raj Thackeray To Visit Nashik On February 1st : उद्धव ठाकरेंनंतर आता राज ठाकरेही नाशिकमध्ये...
Uddhav thackeray, Raj Thackeray
Uddhav thackeray, Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Raj Thackeray Nashik Politics News :

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे 1 फेब्रुवारीपासून नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. तब्बल चार दिवस ते नाशिकमध्ये तळ ठोकणार असून आगामी लोकसभेचे रणशिंग यावेळी फुंकण्यात येऊ शकते. Nashik लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मनसैनिकांनी तयारी केली आहे. त्यांना राज ठाकरे यांच्या सिग्नलची प्रतीक्षा आहे.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 12 जानेवारीला नाशिकचा दौरा झाला. तेव्हापासून नाशिकमध्ये एकामागून एक राजकीय घडामोडी घडत आहेत. पंतप्रधान मोदींनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही दिवसांपूर्वी म्हणजे 22 जानेवारीला नाशिक दौऱ्यावर येऊन गेले. नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे अधिवेशनही झाले. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाहही नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. आता Raj Thackeray ही नाशिकमध्ये येत असल्याने नाशिकचे वातावरण तापले आहे.

Uddhav thackeray, Raj Thackeray
Raj Thackeray Today News : ठाकरेंचा नाशिकवर विश्वास; सलीम शेख नवे प्रदेश उपाध्यक्ष

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मागील काही महिन्यांमध्ये पक्षीय पातळीवर महत्त्वाचे बदल केलेत. त्याचे परिणाम हळूहळू पुढे येऊ लागले आहेत. राम मंदिर सोहळ्यादरम्यान पक्षातर्फे 51 हजार लाडूंचे वाटप करण्यात आले. तर, विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनसुद्धा पार पडले. नाशिक लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी स्थानिक पदाधिकारी आग्रही आहेत. यासाठी स्थानिक पातळीवर अगदी बुथनिहाय नियोजन करण्यात आल्याचा दावा करण्यात येतो.

तुम्ही तयारीला लागा मी सांगतो, असा निरोपच राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला होता. आता खुद्द राज ठाकरे तब्बल चार दिवस नाशिकमध्ये तळ ठोकणार असल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

लोकसभा, विधानसभा आणि पाठोपाठ महापालिका निवडणुका पार पडणार आहेत. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये झालेली फाटाफूट आणि एकसंध राहिलेल्या भाजपबाबत असलेली नकारात्मकता यामुळे मनसेसाठी हा माहौल चांगला आहे. तसा अहवालसुद्धा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवला आहे. आता राज ठाकरे काय निर्णय घेतात, याकडे मनसैनिकांचे लक्ष लागले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

...तर मनसे पुन्हा रेसमध्ये

दरम्यान, लोकसभेपेक्षा विधानसभा आणि महापालिका निवडणुका पक्षासाठी महत्त्वाच्या आहेत. यामुळे कार्यकर्त्यांना पाठबळ तर मिळेलच. मात्र पक्षालाही चालनाही मिळेल. 2009 मध्ये पक्ष स्थापन केल्यानंतर प्रथमच मनसे महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे गेला. 2012 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये राज ठाकरे यांच्या सुप्त लाटेमध्ये सर्वच पक्षांची तारांबळ उडाली होती. पहिल्याच झटक्यात महापालिकेवर मनसेचा झेंडा फडकला होता. तसेच नाशिकमधून पक्षाला दोन आमदारदेखील मिळाले होते.

पण हळूहळू पक्षाची वाताहत झाली. अनेक नेत्यांनी पक्षाकडे पाठ फिरवली. माजी महापौर अशोक मुर्तडक, नगरसेवक सलीम शेख, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांच्यासारखे निष्ठावंत कार्यकर्ते अजून तग धरून आहेत. राजकीय करिष्मा करण्याची ताकद राज ठाकरे यांच्यात आहे. त्यांनी पहिल्याप्रमाणे नाशिकला तळ ठोकण्यास सुरुवात केली आणि पक्षाची धुरा थेट सांभाळली तर आगामी निवडणुकांमध्ये मनसे पुन्हा रेसमध्ये परतू शकते.

edited by sachin fulpagare

R...

Uddhav thackeray, Raj Thackeray
Aaditya Thackeray News : 'आमचे सरकार पुन्हा येईल आणि शिक्षण क्षेत्रासाठी काम करेल'; आदित्य ठाकरेंचा दावा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com