Kapil Patil Politics : निवडणूक तोंडावर आली अन् कपिल पाटील...

BJP MP Kapil Patil open PR office in Badlapur : दुसऱ्या टर्मची खासदारकी संपताना बदलापूरमध्ये उघडले जनसंपर्क कार्यालय
BJP MP Kapil Patil
BJP MP Kapil PatilSarkarnama
Published on
Updated on

भाग्यश्री प्रधान-आचार्य

Badlapur News : भिवंडीचे खासदार आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांची खासदारकीची ही दुसरी टर्म. त्यांच्या लोकसभा मतदारसंघात बदलापूरचा समावेश होतो. तरीही येथे भाजप (BJP) खासदार कपिल पाटील यांचे जनसंपर्क कार्यालय नव्हते. याची जाणीव त्यांना आता झाली आणि तब्बल 10 वर्षांनी बदलापूरमध्ये त्यांनी जनसंपर्क कार्यालय सुरू केले.

लोकसभेची (Loksabha Election) निवडणूक जवळ आली आणि भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांना जाणीव झाली की, आपले बदलापूरमध्ये जनसंपर्क कार्यालय नाही. या पार्श्वभूमीवर त्यांनी आता बदलापूरकरांच्या समस्या सोडवण्यासाठी पश्चिमेकडे जनसंपर्क कार्यालय सुरू केले आणि बदलापूरकरांच्या सर्व समस्यांचे निराकरण येथेच करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. दरम्यान, निवडणुका तोंडावर आल्याने लोकांचे प्रश्न जाणून घ्यायची आठवण खासदारांना झाल्यांची चर्चा आता बदलापूरकर करत आहेत.

BJP MP Kapil Patil
Uddhav Thackeray : एकनाथ शिंदेंना मात देण्यासाठी ठाकरे पिता-पुत्राचे ठाणे-कल्याणमध्ये 'ठाण'

आगामी निवडणुकांचा काळ पाहता सर्वच राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधी सक्रिय झाले आहेत. कार्यकर्त्यांचे मेळावे, स्पर्धांचे आयोजन, कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळत आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न देखील सुरू झाले आहेत. जनसंपर्क वाढवण्यासाठी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचे आदेशच काही राजकीय पक्षांनी लोकप्रतिनिधींना दिले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या पार्श्वभूमीवर केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी बदलापूरला जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे. कपिल पाटील यांचे भिवंडी, शहापूर आणि कल्याणमध्ये जनसंपर्क कार्यालय आहे मात्र, सुसंस्कृताचे शहर अशी ओळख असलेल्या आणि जवळपास तीन लाख लोकसंख्या असलेल्या बदलापूरकरांना त्यांच्या खासदारांशी थेट संपर्क साधण्यासाठी कल्याण अथवा भिवंडीपर्यंत प्रवास करावा लागत होता.

रेल्वे प्रश्नही जैसे थे...

नऊ वर्षांत प्रवाशांचे रेल्वे संदर्भात प्रश्न मार्गी लागलेले नाहीत. त्यामुळे बदलापूरकर त्रस्त झाले आहेत.

(Edited by Avinash Chandane)

BJP MP Kapil Patil
Uddhav Thackeray In Kalyan : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचा 'गनिमी कावा'; मुख्यमंत्री पुत्र खासदारांचा 'करेक्ट कार्यक्रम..'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com