Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar sarkarnama
मुंबई

Prakash Ambedkar News : राजकीय ताकद वाढवा; जालना लोकसभा अपक्ष लढा...प्रकाश आंबेडकरांचा जरांगेंना सल्ला

Manoj Jarange Patil येणाऱ्या विधानसभेत जरांगे पाटील आपला दबाव गट उभा करू शकतात. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाचे आरक्षण शाबूत करू शकतात, असेही आंबेडकर म्हणाले.

Umesh Bambare-Patil

Prakash Ambedkar News : मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार या नेत्यांनी तुम्हाला फसवले आहे. तरीही त्यांच्यावरच तुम्ही विश्वास ठेवत असला तर त्यातून तुमची फसगत होणार आहे. त्यापेक्षा राजकीय ताकद वाढवून जालनातून अपक्ष लोकसभा निवडणूक लढावी, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे पाटलांना दिला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण व मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर पत्रकार परिषदेत भाष्य केलं. मनोज जरांगे यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करावी. ते निवडून येतील, अशी आम्हाला खात्री आहे. लोकसभेच्या निमित्ताने गरीब मराठ्यांचा प्रश्न सोडवण्यात येतो, हे आम्ही त्यांना सांगणार आहोत. ते मान्य करतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

जरांगे पाटलांचे आंदोलन सुरू असून, ओबीसीवालेही मोर्चे काढत आहेत. जरांगे जोपर्यंत राजकीय भूमिका घेत नाहीत. तोपर्यंत ते पाहिजे ते करू शकणार नाहीत. या सर्व निजामी मराठ्यांनी अण्णाराव पाटलांपासून खेडेकरांपर्यंत सर्वांना पचवून टाकले आहे. जरांगे पाटील हे त्यांच्यापेक्षा वेगळे आहेत, हे दाखविण्यासाठी त्यांनी जालना लोकसभा जिंकली पाहिजे, लढली पहिजे, ते जिंकतीलही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

येणाऱ्या विधानसभेत ते आपला दबाव गट उभा करू शकतात. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाचे आरक्षण शाबूत करू शकतात. त्यांनी राजकीय तयारी केली पाहिजे. ते लढले नाहीत तर त्यांचाही अण्णाराव पाटील झालाच असे मी म्हणेन. त्यांनी अपक्ष लढावं, कारण पक्षाबरोबर बंधनं येतात. आज त्यांची मागणी पाहता वंचितशिवाय कुणीही पाठिंबा देत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.की

जरांगे पाटलांनी येत्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाचा आधार न घेता जालना येथून स्वतंत्रपणे लढले पाहिजे. हा लढा राजकीय केला पाहिजे. तुम्हाला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी फसविले, त्यांच्यावरच विश्वास ठेवणार असाल तर तुमची फसगत होणार आहे. फसगत करायची नसेल तर राजकीय ताकद उभी करावी लागेल.

Edited By : Umesh Bambare

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT