Lok Sabha Election 2024  Sarkarnama
मुंबई

Lok Sabha Election 2024 : "महाराष्ट्रातील 48 जागा 'इंडिया आघाडी' जिंकणार.." ; महिला काँग्रेस अध्यक्षांचा दावा!

Alka Lamba Meeting In Thane : "ममता बॅनर्जी या इंडिया आघाडी सोबत आहेत आणि त्या इंडिया आघाडीसोबत राहणार..."

Pankaj Rodekar

Thane News : इंडिया आघाडी महाराष्ट्रातील 48 जागा फक्त लढणारच नाही, तर त्या सर्व जागा जिंकणार असल्याचा दावा अखिल भारतीय राष्ट्रीय महिला काँग्रेस अध्यक्षा अलका लांबा यांनी गुरुवारी ठाण्यात केला. जर महिला आरक्षण आजच लागू झाले असते, तर यंदा महाराष्ट्रातून 13 ते 14 महिला निवडून लोकसभेत गेल्या असत्या. मात्र भाजपाने महिला आरक्षण कायदा लागू न करता, त्यांचा हक्क हिरावून घेतला आहे. पण, जास्तीत जास्त महिलांना लोकसभेत पाठविण्यासाठी जागा वाटपात काँग्रेसच्या वाटेला येणाऱ्या जागेवर महिलांना प्राधान्याने उमेदवार देणार असल्याचे, सूचक विधानही त्यांनी यावेळी केले. याशिवाय ममता बॅनर्जी या इंडिया आघाडी सोबत आहेत आणि त्या इंडिया आघाडीसोबत राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. (Latest Marathi News)

ठाण्यात तीन हात नाका येथील टिपटॉप प्लाझा हॉटेलमध्ये गुरुवारी महिला विस्तारीत कार्यकारिणीची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी त्या आल्या असताना, या बैठकीला संबोधित करण्यापूर्वी लांबा यांनी एक पत्रकार परिषदेत या संबंधित दावा केला. पुढे बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधत, भाजपने महिला सक्षमीकरण करण्यासाठी 33 टक्के महिला आरक्षणाचा कायदा आणला. पण, तो लागू कधी होणार हे माहीत नाही.जर हा कायदा लागू झाला असता, तर महाराष्ट्रातील जास्त महिला लोकसभेवर निवडून गेल्या असता, तेथे जाऊन त्यांनी होणाऱ्या अत्याचार आणि हक्कासाठी लढून आवाज उठवला असता, असेही त्या म्हणाल्या.

मात्र त्या महिलांना भाजपने वंचित ठेवून न्याय हक्कापासून अर्धवट ठेवण्याचे काम केल्याचा आरोप लांबा यांनी केला. मात्र ही लढाई भारत जोडो यात्रेत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात येईल असे ही त्या म्हणाल्या. तर भारत जोडो यात्रा 15 ते 20 मार्च दरम्याम मुंबईत येणार आहे. ती यात्रा यशस्वी करण्यासाठी पूर्ण तयारीने महिला काँग्रेस प्रयत्नशील असल्याचेही त्या म्हणाल्या.

दरम्यान अलका लांबा यांनी आपण ज्या ठिकाणी आलो आहे. तो मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे. त्यांचे हे सरकार कसे आले. त्यावेळी कुठे आमदारांना लपून ठेवले होते. त्यांना कोण वाचत होते. त्यावेळी सरकार पाडण्याचे काम कोण करत होते. असा सवाल उपस्थित करत, ते काम दिल्लीतील भाजप सरकार करत होते असा आरोपही त्यांनी केला. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र महिला काँग्रेस अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे व आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT