Milind Deora Resign Congres : आदित्य ठाकरेंची एकच सभा अन् देवरा काँग्रेसमधून आऊट; कुठे पडली ठिणगी?

Milind Deora Resign Congres : उमेदवारी मिळण्याच्या सर्व शक्यता मावळल्या होत्या...
Milind Deora Resign Congres :
Milind Deora Resign Congres : Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यानंतर ते आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. काँग्रेसच्या 10 माजी नगरसेवकांसह, 25 विद्यमान पदाधिकाऱ्यांसह ते शिवसनेत प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्र्यांनीही देवरा शिवसेनेत येणार असतील तर त्यांचं स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

Milind Deora Resign Congres :
NCP News : अजित पवार औरंगजेबाचे पाठीराखे झालेत का? राष्ट्रवादीतच जुंपली...

आताच राजीनामा का?

काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात पार पडला आणि या मेळाव्याला आमदार आदित्य ठाकरे यांनी मार्गदर्शन केले होते. दक्षिण मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा खासदार निवडून येणार, असा विश्वास त्यांनी या मेळाव्या दरम्यान दाखवला. मात्र, काँग्रेसचे नेते मिलिंद देवराही या मतदारसंघातून लोकसभेला इच्छुक होते. देवरांनी ठाकरेंच्या या सभेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दक्षिण मुंबईत आपला प्रभाव जास्त असल्याचा दावा ठाकरेंनी केला होता. यामुळे नाराज होऊन माझाही या मतदारसंघावर दावा आहे, असे वक्तव्य मिलिंद देवरा यांनी केले होते.

Milind Deora Resign Congres :
Eknath Shinde On Milind Deora : मिलिंद देवरा तुमच्याकडे येणार का? शिंदे म्हणाले, 'मला माहिती नाही..'

महाविकास आघाडीतून दक्षिण मुंबईचा उमेदवार ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत असणार आहे, हे जवळपास निश्चित आहे. यामुळे देवरा यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याच्या सर्व शक्यता संपल्या होत्या. त्यामुळे आगामी लोकसभा निव़णुकीत शिंदे गटाचे उमेदवारीची चाचपणी करुन, त्यांनी शिंदेच्या शिवसनेत प्रवेश घेतला आहे.

Milind Deora Resign Congres :
Milind Deora : तथास्तु...! मिलिंद देवरा यांनी पक्ष सोडताच काँग्रेसचा बडा नेता असं का म्हणाला?

मिलिंद देवरा कोण ?

काँग्रेस नेते मिलिंद देवरा हे काँग्रेसचे दिवंगत नेते मुरली देवरा यांचे मुलगे आहेत. राजकारणाचा वारसा त्यांना आपल्या वडिलांकडून मिळाला. काँग्रेसचे ते 2004-09 आणि 2009-2014 असे दोन टर्म खासदार होते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये ते पेट्रोलियम मंत्रीही राहिलेले आहेत. काँग्रेसमधील एक सुसंस्कृत आणि उच्चशिक्षित नेता अशी त्यांची ओळख होती.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com