Womens in Maharashtra Politics: काँग्रेस -राष्ट्रवादीत आता महिला राज...

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन दिवसात दोन मोठ्या घडामोडी घडल्याचे पाहायला मिळाले
 MP Supriya sule | MLA Varsha Gaikwad
MP Supriya sule | MLA Varsha Gaikwad Sarkarnama
Published on
Updated on

Womens in Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन दिवसात दोन मोठ्या घडामोडी घडल्याचे पाहायला मिळाले. पहिली म्हणजे वर्षा गायकवाड यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. दुसरी म्हणजे खासदार सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या दोन महिला नेत्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महत्त्वाच्या पदांवर संधी दिली आहे.

वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) या माजी मंत्री व खासदार एकनाथ गायकवाड यांच्या कन्या. पण त्यांची ओळख एवढीच नाही. २००४ मध्ये एकनाथ गायकवाड यांची लोकसभेवर निवड झाल्यापासून वर्षा गायकवाड यांनी धारावी मतदारसंघाचे नेतृत्त्व केलं आहे. या मतदार संघातून विधानसभेवर सातत्याने निवडून येत आहेत.

 MP Supriya sule | MLA Varsha Gaikwad
Ajit Pawar News : अजितदादांच्या अनुपस्थितीची पुन्हा एकदा चर्चा; काय आहे कारण?

तसेच महाविकास आघाडीच्या काळातही त्यांनी शालेय शिक्षण व महिला आणि बालकल्याण ही महत्त्वाची खाती भूपविली आहेत. दलित चेहरा म्हणून काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना संधी दिली आहे.

सुप्रिया सुळे (Supriya Sule) या शरद पवार यांची कन्या. २००६ मध्ये त्यांना पहिल्यांदा राज्यसभेवर जाण्याची संधी मिळाली.लोकसभेत त्यांची कामगिरी नेहमीच चांगली राहिली आहे. विशेष म्हणजे सलग सात वर्षे त्यांनी 'संसदरत्न' हा हा मानाचा पुरस्कार पटकावला आहे. खरंतर, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांच्याकडे कोणतेही पद नसले तरी पवारांची कन्या म्हणून पक्षातील कारभारात त्यांचा शब्दही तितकाच पाळला जातो.

 MP Supriya sule | MLA Varsha Gaikwad
Praful Patel News : प्रफुल्ल पटेल कसे बनले पवारांचे निकटवर्तीय ? ; NCPचे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे पद, सहा वेळा खासदार..

पण दुसरीकडे, राज्याच्या नव्या मंत्रिमंडळात मात्र अद्याप एकाही महिलेचा समावेश करण्यात आलेला नाही. भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांचा आक्रमक बाणा आपण पाहिलाच आहे. पण त्या राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आल्या आहेत. भाजपने माजी महिला प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांना विधान परिषदेची आमदारकी दिली आहे. मंदा म्हात्रे , श्वेता महाले, मनीषा चौधरी , देवयानी फरांदे , आदी महिला आमदार मंत्रिपदाच्या आशेवर आहेत, आता भाजप कुणाला संधी देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Maharashtra Poltiics)

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com