"Vijay Kumbhar presents video evidence in the IPS Anjana Krishna case, stressing how police arrived on time to avert a major mishap." Sarkarnama
मुंबई

IPS Anjana Krishna update : अंजना कृष्णा वेळेवर आल्या नसत्या तर..! विजय कुंभार यांनी समोर आणला व्हिडीओ

IPS Anjana Krishna case: New video emerges : सोलापुरातील कुर्डू प्रकरणानंतर आता अजित पवार निर्दोष होते आणि सगळी चूक फक्त अंजना कृष्णा यांचीच होती असं दाखवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे विजय कुंभार यांनी म्हटले आहे

Rajanand More

IPS officer controversy : सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू गावातील मुरूम उपसाप्रकरण देशभरात गाजत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील फोनवरील संवादाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या प्रकरणावरून उलटसुलट चर्चा होत असून काही जणांनी अंजना कृष्णा यांचीच चूक असल्याचा दावा केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील नेत्या रुपाली ठोंबरे यांनी अंजना कृष्णा यांना कोर्टात खेचण्याचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे आम आदमी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी कुर्डू गावातील एक व्हिडीओ सोशल मीडियात पोस्ट केला आहे. पोलिस वेळेवर आले नसते तर तिथं मोठा अनर्थ अटळ होता, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

सोलापुरातील कुर्डू प्रकरणानंतर आता अजित पवार निर्दोष होते आणि सगळी चूक फक्त अंजना कृष्णा यांचीच होती असं दाखवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगत विजय कुंभार यांनी म्हटले आहे की, त्यात भर म्हणजे “ते तर दिवाणी प्रकरण होतं, पोलिसांचं तिथे काय काम?” असे निरर्थक सवालही उपस्थित केले जात आहेत. पण वास्तव स्पष्ट आहे.

व्हिडीओचा आधार घेत कुंभार यांनी म्हटले आहे की, त्या दिवशी जे घडलं त्याचा व्हिडिओ पुरावा आहे. परिस्थिती अत्यंत गंभीर व तणावपूर्ण होती. जर पोलिस वेळेवर आले नसते तर तिथं मोठा अनर्थ अटळ होता. मग अशा परिस्थितीत “पोलिसांची आवश्यकता नव्हती, काहीच घडलं नव्हतं” असं सांगणं म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यासारखं आहे. हा प्रयत्न केवळ दिशाभूल करणारा नाही, तर वास्तव लपवण्याचाही घातकी डाव असल्याची टीका कुंभार यांनी केली आहे.

दरम्यान, कुर्डू गावातील ग्रामस्थांनी अवैध उत्खननाचे आरोप खोटे असल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी गावकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल केले असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. दुसरीकडे आयपीएस अंजना कृष्णा यांनाही पाठिंबा वाढत चालला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्यातील संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT