IPS Anjana Krishna : अंजना कृष्णा थेट अजित पवारांना भिडल्या; Video वडिलांपर्यंत पोहोचला, रोखठोक प्रतिक्रिया आली समोर...

Anjana Krishna father reaction : अंजना कृष्णा या मुळच्या केरळच्या आहेत. सध्या त्या सोलापूर जिल्ह्यात करमाळा येथे पोलीस उपअधिक्षक या पदावर कार्यरत आहेत. त्यांचे वडील तिरूअनंतपुरम याठिकाणी व्यावसायिक आहेत.
"IPS Anjana Krishna’s viral video confronting Ajit Pawar sparks political and public reactions."
"IPS Anjana Krishna’s viral video confronting Ajit Pawar sparks political and public reactions."Sarkarnama
Published on
Updated on

Anjana Krishna Ajit Pawar clash : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अंजना कृष्णा यांच्यातील संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियात तुफान व्हायरल झाला आहे. त्यावरून आता राजकारणही तापले असून उलटसुलट प्रतिक्रियाही येत आहेत. अजिदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांची पाठराखण केली आहे. तर विरोधी पक्षातील काही नेते व सामाजिक संघटनांनी अंजना कृष्णा यांच्या कृतीचे कौतुक केले आहे. आता या वादावर त्यांच्या वडिलांचीही प्रतिक्रिया आली आहे.

अंजना कृष्णा या मुळच्या केरळच्या आहेत. सध्या त्या सोलापूर जिल्ह्यात करमाळा येथे पोलीस उपअधिक्षक या पदावर कार्यरत आहेत. त्यांचे वडील तिरूअनंतपुरम याठिकाणी व्यावसायिक आहेत. लेकीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी फोनवर बोलतानाचा व्हायरल व्हिडीओ त्यांच्यापर्यंतही पोहचला आहे. त्यांनी यावर आपली रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.

अंजना कृष्णा यांचे वडील बिजू यांनी द न्यू इंडियन एक्सप्रेसशी बोलताना या वादावर आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ती फक्त आपले कर्तव्य बजावत होती. त्यामध्ये तिने काहीही असामान्य केलेले नाही. ती फोनवर उपमुख्यमंत्र्यांना ओळखू शकली नाही. तिने फोनवर बोलत असलेल्या व्यक्तीला म्हटले की, एवढीच काळजी असेल तर थेट आपल्या फोनवर कॉल करून बोलावे. तिने तिचे काम केले, एवढेच.

"IPS Anjana Krishna’s viral video confronting Ajit Pawar sparks political and public reactions."
Amol Mitkari : IPS अंजना कृष्णा यांची पुजा खेडकरशी तुलना करणं अमोल मिटकरींना पडलं महागात : माघार घेत म्हणाले, "मी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या..."

घटनेनंतर शुक्रवारी आम्ही तिच्याशी बोललोही. या घटनेला फार गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही, असेही अंजना कृष्णा यांच्या वडिलांनी सांगितले. तिने कधीही कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाचा उल्लेख केलेला नाही. आम्ही घरी तिच्या कामाशी संबंधित मुद्दयांवर चर्चा करत नाही. काही गोष्टी ट्रेंड होतात, म्हणून त्या खऱ्या असतात, असे नाही. या मुद्द्याला चुकीचे पध्दतीने समोर आणलेले असू शकते, असेही अंजना यांच्या वडिलांनी सांगितले.

"IPS Anjana Krishna’s viral video confronting Ajit Pawar sparks political and public reactions."
IPS Anjana Krishna Controversy : IPS अंजना कृष्णा यांना कोर्टात खेचणार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्याची मोठी घोषणा

थेट उपमुख्यमंत्र्यांना भिडणाऱ्या अंजना कृष्णा यांचे अनेक राजकीय नेते तसेच सामाजिक संघटनांनी कौतुकही केले आहे. त्यावर त्यांच्या वडिलांनी या कौतुकांचे आम्ही स्वागत करतो. पण ती अशाप्रकारे प्रकाशझोतात येऊ इच्छित नाही. ती कामावर लक्ष केंद्रीत करते आणि पुढेही असेच कर्तव्य बजावत राहील, असे अंजना कृष्णा यांच्या वडिलांनी स्पष्ट केले.      

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com