Mamata Banerjee News : उद्धव ठाकरेंनी 3 वर्षांपूर्वी घेतलेल्या निर्णयाचे ममतादीदींकडून अनुकरण; बंगालमध्ये वादाची ठिणगी

Mamata Banerjee issues Bengali language order in Kolkata : कोलकाता महापालिकेच्या निर्णयानंतर दुकानदारांनी पाट्या बदलण्यास सुरूवात केली आहे. कोलकाता महापालिकेत ममतादीदींच्या तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे.
Mamata Banerjee announces compulsory Bengali language order in Kolkata, inspired by Uddhav Thackeray’s earlier decision.
Mamata Banerjee announces compulsory Bengali language order in Kolkata, inspired by Uddhav Thackeray’s earlier decision.Sarkarnama
Published on
Updated on

Mamata Banerjee Bengali order : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर असताना उद्धव ठाकरे यांनी मराठी बाणा दाखवत राज्यातील प्रत्येक दुकानांवरील पाट्या मराठीत करण्याची सक्ती केली होती. जानेवारी 2022 मध्ये ठाकरेंच्या मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला होता. त्याच निर्णयाची अंमलबजावणी सध्या महायुती सरकारकडूनही केली जात आहे. आता पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या निर्णयावरून वादाला तोंड फुटले आहे.

पश्चिम बंगालमध्ये मागील काही दिवसांपासून भाषावाद पेटला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून बंगाली भाषेसाठी कंबर कसली आहे. कोलकाता महापालिकेने नुकताच मोठा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील दुकाने आणि अन्य आस्थापनांवरील नावांच्या पाट्या बांग्ला भाषेतच असावीत, असे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यावरून वाद निर्माण झाला आहे.

कोलकाता महापालिकेच्या निर्णयानंतर दुकानदारांनी पाट्या बदलण्यास सुरूवात केली आहे. कोलकाता महापालिकेत ममतादीदींच्या तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे. या निर्णयावरून भाजपने नाराजीची सूर आळवला आहे. महापालिकेने निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी दुकानदारांना 30 तारखेपर्यंतची मुदत दिली आहे. अन्यथा कारवाईचा करण्याचा इशारा दिला आहे.

Mamata Banerjee announces compulsory Bengali language order in Kolkata, inspired by Uddhav Thackeray’s earlier decision.
ED summons BJP worker : राहुल गांधींना कोर्टात खेचणाऱ्या भाजप कार्यकर्त्यावर ED ची करडी नजर; 14 महिन्यांनंतर मोठी घडामोड

बंगाली भाषेची ओळख आणि गौरव कायम ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा महापालिकेतील अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. पाट्यांवर बंगाली भाषेचा वापर बंधनकारक करण्याबरोबरच या भाषेखाली इतर भाषांमधील नावे लिहिण्याची परवानगीही देण्यात आली आहे. पण सर्वात वर बंगाली भाषेच बंधन घालण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांच्या एका पत्रामध्ये बंगाली भाषेचा उल्लेख बांग्लादेशी भाषा असा करण्यात आला होता. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. हे भाजपचे षडयंत्र असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला होता. बंगालींविषयी भाजपच्या मनात द्वेष असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला होता. त्यानंतर भाषेचा मुद्दा चांगलाच तापला आहे.

Mamata Banerjee announces compulsory Bengali language order in Kolkata, inspired by Uddhav Thackeray’s earlier decision.
IPS Anjana Krishna : अंजना कृष्णा थेट अजित पवारांना भिडल्या; Video वडिलांपर्यंत पोहोचला, रोखठोक प्रतिक्रिया आली समोर...

भाजपकडून बांग्लादेशी घुसखोरांचा मुद्दा तापवला आहे. त्याचे रुपांतर आता भाषा वादामध्ये झाले असून ममता बॅनर्जी यांच्याकडून बंगाली भाषेवरून राज्यातील नागरिकांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. महाराष्ट्रातही मागील काही दिवसांपूर्वी हिंदी भाषेचा मुद्दा तापला होता. पहिलीपासून हिंदी शिकविण्यास मोठा विरोध झाला होता. राज ठाकरे व उद्धव टाकरे यांनी त्याविरोधात आंदोलन पुकारले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com