Major IPS reshuffle in Maharashtra  Sarkarnama
मुंबई

IPS Transfers: राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका! DIG, SP, SPS, IGP दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडकाच फडणवीस सरकारनं लावला असून गुरुवारी एकाच दिवसात विविध स्तरावरील तब्बल ४१ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत.

Amit Ujagare

राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडकाच फडणवीस सरकारनं लावला असून गुरुवारी एकाच दिवसात विविध स्तरावरील तब्बल ४१ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. यामध्ये विशेष पोलीस महासंचालक, पोलीस उपमहानिरिक्षक, पोलीस अधीक्षक, SPS या पदांसाठी या बदल्या निघाल्या आहेत. यामध्ये नेमक्या कोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या नेमक्या कुठे झाल्या? जाणून घेऊयात.

पोलीस उपमहानिरिक्षक

१. शिवाजी राठोड (अपर पोलीस आयुक्त, नागपूर शहर) - बदलीचं ठिकाण (अपर पोलीस आयुक्त, ठाणे शहर)

२. प्रमोद शेवाळे (पोलीस उपमहानिरिक्षक, दहशतवादविरोधी पथक, पुणे) - बदलीचं ठिकाण (अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, नवी मुंबई)

३. विनिता साहू (प्रतिक्षाधीन) - बदलीचं ठिकाण (पोलीस उपमहानिरिक्षक, राज्य राखीव पोलीस बल, मुंबई)

४. अशोक दुधे (पोलीस उपमहानिरिक्षक, राज्य राखीव पोलीस बल, मुंबई) - बदलीचं ठिकाण (अपर पोलीस आयुक्त, ठाणे शहर)

५. आर. राजा (पोलीस अधीक्षक, बिनतारी संदेश) - बदलीचं ठिकाण (अपर पोलीस आयुक्त, बिनतारी संदेश, मुंबई)

पोलीस अधीक्षक

१. शीला साईल (प्रतिक्षाधीन) - बदलीचं ठिकाण (पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर)

२. बाळासाहेब पाटील (पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर) - बदलीचं ठिकाणं (पोलीस उप आयुक्त, ठाणे शहर)

३. एस. एस. बुरसे (पोलीस उप आयुक्त, ठाणे शहर) - बदलीचं ठिकाण (उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई)

४. श्रीकांत परोपकारी (पोलीस उप आयुक्त, ठाणे शहर) - बदलीचं ठिकाण (उप आयुक्त, सागरी सुरक्षा, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई)

५. रविद्र परदेशी (उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई) बदलीचं ठिकाण (समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.१, पुणे)

६. कुमार चिंथा (पोलीस उप आयुक्त, नागपूर शहर) (बदली रद्द करण्यात येत आहे)

७. प्रकाश जाधव (प्रतिक्षाधीन) - बदलीचं ठिकाण (पोलीस अधीक्षक, छत्रपती सांभाजीनगर ग्रामीण)

८. विनय राठोड (पोलीस अधीक्षक, छत्रपती सांभाजीनगर) बदलीचं ठिकाण (पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण)

९. नित्यानांद झा (पोलीस अधीक्षक, यवतमाळ) (बदली रद्द करण्यात येत आहे)

१०. धीरज कुमार बच्चु (अपर पोलीस अधीक्षक, कोल्हापूर) बदलीचं ठिकाण (पोलीस उपआयुक्त, ठाणे शहर)

११. विमला एम. (समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.१९, अहिल्यानगर) बदलीच ठिकाण (अपर पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण)

SPS बदल्या

१. शशिकांत बोराटे (पोलीस उप आयुक्त, ठाणे शहर) - बदलीचं ठिकाण (पोलीस अधीक्षक, राज्य पोलीस नियंत्रण कक्ष)

२. संभाजी कदम (पोलीस अधीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे) - बदलीचं ठिकाण (पोलीस अधीक्षक, दहशतवादविरोधी पथक, पुणे)

३. अकबर पठाण (पोलीस अकादमी, नाशिक) - बदलीचं ठिकाण (बदली रद्द करुन नियुक्ती, मुंबई शहर)

४. विवेक पाटील (प्रतिक्षेत) - बदलीचं ठिकाण (पोलीस अधीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)

५. विवेक पानसरे (पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर) - बदलीचं ठिकाण (पोलीस उप आयुक्त, ठाणे शहर)

६. अमरसिंह जाधव (पोलीस उप आयुक्त, ठाणे शहर) - बदलीचं ठिकाण (पोलीस अधीक्षक, डायल-११२, नवी मुंबई)

७. संजय सरगौडा पाटील (पोलीस उप आयुक्त, पिंपरी चिंचवड) - बदलीचं ठिकाण (पोलीस उप आयुक्त, मिरा-भाईंदर, वसई-विरार)

८. अमोल झेंडे (पोलीस अधीक्षक, दक्षता अधिकारी, पीएमआरडीए) - बदलीचं ठिकाण (पोलीस उपआयुक्त, मिरा भाईंदर, वसई-विरार)

९. दिपक गिर्हे (पोलीस उप आयुक्त, अमरावती) - बदलीचं ठिकाण - (पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, नाशिक)

१०. शिवाजी पवार (पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर) - बदलीचं ठिकाण (पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, पुणे)

११. विक्रांत देशमुख (पोलीस उप आयुक्त, मिरा भाईंदर, वसई विरार) - बदलीचं ठिकाण (पोलीस उप आयुक्त, पिंपरी-चिंचवड)

१२. प्रिती टिपरे (पोलीस उप आयुक्त, मिरा भाईंदर, वसई-विरार - बदलीचं ठिकाण (सह आयुक्त, अन्न औषध प्रशासन, मुंबई)

१३. समीर शेख (राज्य पोलीस नियंत्रण कक्ष) - बदलीचं ठिकाण (अपर पोलीस अधीक्षक, बीड)

१४. हिंमत जाधव (पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर) - बदलीचं ठिकाण (अपर पोलीस अधीक्षक, अंमलीपदार्थ विरोधी टास्कफोर्स, पुणे)

१५. रमेश चोपडे (उप आयुक्त, सागरी सुरक्षा, मुंबई) - बदलीचं ठिकाण (पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज, दौंड)

१६. दत्तात्रय कांदळे (प्रतिक्षाधीन) - बदलीचं ठिकाण (पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर)

१७. निलश सोनावणे (पोलीस उप आयुक्त, बिनतारी सागरी विभाग, नवी मुंबई) - बदलीचं ठिकाण (पोलीस उप आयुक्त, ठाणे शहर)

१८. तानाजी चिखले (डायल ११२) - बदलीचं ठिकाण (अपर पोलीस अधीक्षक, परभणी)

विशेष पोलीस महानिरिक्षक

१. प्रवीण पडवळ (विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र) - बदलीचं ठिकाण (विशेष पोलीस महानिरीक्षक, व्हीआयपी सुरक्षा, दादर)

२. शारदा राऊत (प्रतिक्षाधिन) - बदलीचं ठिकाण (विशेष पोलीस महानिरीक्षक, महिला अत्याचार प्रतिबंध विभाग)

३. संजय येनपुरे (विशेष पोलीस महानिरीक्षक, व्ही.आय.पी, सुरक्षा, दादर) - बदलीचं ठिकाण (विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र)

४. रामनाथ पोकळे (विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र) - बदलीचं ठिकाण (विशेष पोलीस महानिरीक्षक, (नियोजन व समन्वय), महाराष्ट्र राज्य, मुंबई)

५. संदीप पाटील (विशेष पोलीस महानिरीक्षक, नक्षल विरोधी कारवाई) - बदलीचं ठिकाण (विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र)

६. पंजाबराव उगले (विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ) - बदलीचं ठिकाण (पोलीस सह आयुक्त, ठाणे शहर)

७. महेश पाटील (विशेष पोलीस महानिरीक्षक, (नियोजन व समन्वय), महाराष्ट्र राज्य, मुंबई) - बदलीचं ठिकाण (विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT