Parbhani Hingoli MLC: भाजपची संघटनात्मक ताकद वाढल्याचा दावा! परभणी-हिंगोली विधान परिषदेच्या जागेसाठी जिल्हाध्यक्षांची धडपड, थेट मुंबई गाठली

Parbhani Hingoli MLC: परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेना लढणार की भाजपा? यावर सध्या चर्चा सुरू आहे.
Ravindra Chavan_Shivaji Bharose
Ravindra Chavan_Shivaji Bharose
Published on
Updated on

Parbhani Hingoli MLC: परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेना लढणार की भाजपा? यावर सध्या चर्चा सुरू आहे. युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे, विप्लव बजोरिया हे २०१८ मध्ये विधानपरिषदेवर निवडून गेले होते. दरम्यान, राज्यात आणि मराठवाड्यात भाजपाची संघटनात्मक ताकद वाढली. परभणीतही भाजपाच नंबर एकचा पक्ष असल्याचा दावा करत जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी परभणी-हिंगोली मतदारसंघ भाजपालाच मिळावा, अशी आग्रही मागणी करत थेट मुंबई गाठली.

Ravindra Chavan_Shivaji Bharose
Babajani Durani: बाबाजानी दुर्राणींचा दबदबा कायम! पक्षांतर्गत विरोधकांना पुरून उरले, पक्षाने पुन्हा दिली मोठी जबाबदारी

प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची भेट घेत शिवाजी भरोसे यांनी स्थानिकमध्ये ही जागा भाजपानेच लढवावी अशी मागणी करत संख्याबळाची आकडेवारीच प्रदेशाध्यक्षांसमोर ठेवली. दुसरीकडे महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही या जागेवर दावा सांगीतला आहे. शिवसेनेने ही जागा आमचीच असल्याचे सांगत विप्लव बजोरिया यांना कामाला लागा, असे आदेश दिल्याची माहिती आहे. आता ही जागा युतीमध्ये नेमकं कोण लढवणार? हे पुढील दोन-तीन दिवसात स्पष्ट होईल.

Ravindra Chavan_Shivaji Bharose
Pulwama Attack Mastermind: पुलवामाचा मास्टरमाईंड हामजा बुरहानचा खात्मा; कुठे घडला थरार? जाणून घ्या

दरम्यान, महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी बुधवारी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. परभणी-हिंगोली विधानपरिषद मतदारसंघाच्या राजकीय समीकरणांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षालाच सोडण्यात यावा, अशी भूमिका शिवाजी भरोसे यांनी मांडली. महायुतीतील जागावाटप, स्थानिक पातळीवरील पक्षाची ताकद, कार्यकर्त्यांची भावना आणि आगामी निवडणुकीतील संभाव्य राजकीय परिस्थिती याबाबतही सखोल चर्चा यावेळी झाल्याचे बोलले जाते.

परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात भाजपची वाढती संघटनात्मक ताकद, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पक्षाचे संख्याबळ तसेच कार्यकर्त्यांमधील उत्साह लक्षात घेता हा मतदारसंघ भाजपकडे राहणे आवश्यक असल्याची भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली. आगामी विधानपरिषद निवडणूक ही केवळ राजकीय प्रतिष्ठेची नसून संघटनात्मक बळ सिद्ध करण्याची संधी असल्याचेही भरोसे यांनी सांगीतले.

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून २०१८च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचे विप्लव गोपीकिशन बाजोरिया हे निवडून गेले होते. हा मतदारसंघ पारंपरिकपणे आणि गेल्या निवडणुकीत शिवसेनेकडे होता. शिवसेना आणि भाजपच्या युतीमध्ये ही जागा शिवसेनेच्या वाट्याला येते. तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीमध्ये या जागेवरून अनेकदा वाटाघाटी झाल्या. २०१२च्या निवडणुकीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती तेव्हा बाबाजानी दुर्राणी आमदार होते. मात्र, २०१८च्या निवडणुकीत राज्य पातळीवरील तडजोडीत हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात आला होता.

Ravindra Chavan_Shivaji Bharose
Kolapur News : 25 कोटी हडप केले; अध्यक्षांसह अख्खं संचालकमंडळ दोषी : करवीर पंचायत समितीच्या पतसंस्थेत गैरव्यवहार

बाबाजानी दुर्राणी राष्ट्रवादीकडून २०१२ ते २०१८ तर विप्लव गोपीकिशन बाजोरिया, शिवसेना २०१८ ते २०२४ मध्ये विधान परिषदेवर या मतदारसंघातून निवडून गेले होते. २०१८ मध्ये झालेली निवडणूक अत्यंत नाट्यमय आणि चुरशीची ठरली होती. संख्याबळ अधिक असतानाही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला या ठिकाणी पराभवाचा धक्का बसला होता. या निवडणुकीत विप्लव बाजोरिया यांनी काँग्रेस-आघाडीच्या सुरेश साहेबराव देशमुख यांचा पराभव केला होता.

आघाडीकडे २९७ मतदारांचे संख्याबळ होते. मात्र, ऐनवेळी मोठ्या प्रमाणावर मते फुटली. अंतिम मतमोजणीत शिवसेनेच्या विप्लव बाजोरिया यांना २५६ मते मिळाली, तर काँग्रेसच्या सुरेश देशमुख यांना २२१ मते मिळाली होती. परिणामी, शिवसेनेचे विप्लव बाजोरिया हे तब्बल ३५ मतांच्या फरकाने विजयी झाले होते. सध्याच्या घडीला महायुतीत या जागेवर शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) हे तिन्ही पक्ष आपापला दावा सांगत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com