Jacqueline Fernandez
Jacqueline Fernandez Sarkarnama
मुंबई

जॅकलिन ईडीच्या जाळ्यात : देशाबाहेर जाताना मुंबई विमानतळावर रोखले!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : दोनशे कोटीच्या खंडणी प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर सोबतच्या संबंधामुळे अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) सध्या चांगलीच अडचणीत सापडली आहे. काही कामानिमित्त देशाबाहेर निघालेल्या जॅकलिनला रविवारी (ता. ५ डिसेंबर) सक्तवसुली संचालनालयाने (ED) मुंबई विमानतळावच थांबवले आहे. (Jacqueline Fernandez was stopped by the ED at the Mumbai airport)

तब्बल दोनशे कोटींच्या खंडणी प्रकरणात सुकेश चंद्रशेखर हा मुख्य सूत्रधार आहे. त्याचा आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो या वर्षीच्या एप्रिल-जून महिन्यातील असल्याचे सांगितले जाते. त्यावेळी सुकेश हा जामिनावर बाहेर होता. जॅकलिनला तो चेन्नईमध्ये चार वेळा भेटला होता, या भेटीसाठी त्याने प्रायव्हेट जेटची व्यवस्था केल्याचे सांगितले जाते.

जॅकलिन फर्नांडिस हिला सुकेश चंद्रशेखर यांनी भेट म्हणून 52 लाखांचा घोडा आणि 9 लाख रुपयांची पर्शियन मांजर भेट दिल्याचे समोर आले आहे. तसेच, त्याने जॅकलिन अनेकवेळा महागडे दागिनेही भेट दिले होते. दरम्यान, सुकेश याच्याविरोधात ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात ही माहिती उघड झाली आहे. या आरोपपत्रात जॅकलिनसोबत आणखी एक अभिनेत्री नोरा फतेही हिचेही नाव आहे.

याच प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस ही ईडीसमोर 20 ऑक्टोबरला हजर झाली होती. चौकशीला सलग चारवेळी दांडी मारल्यानंतर ती ईडीच्या दिल्ली कार्यालयात जॅकलीन चौकशीला सामोरे गेली होती. जॅकलिनचा जबाब कर चुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यातंर्गत नोंदवण्यात आला होता. तिचे आर्थिक व्यवहार आणि सुकेश चंद्रशेखरसोबत तिची ओळख यामुळे ती ईडीच्या रडारवर आहे. सुकेश चंद्रशेखरचा जॅकलिनचा काही आर्थिक व्यवहार झाला होता का? या अंगाने ईडी तपास करत आहे.

दरम्यान, ईडीकडून चौकशी सुरू असतानाच जॅकलिन फर्नांडिस ही काही कामानिमित्त रविवारी सायंकाळी देशाबाहेर निघाली होती. त्याचवेळी ईडीच्या पथकाने तिला मुंबई विमानतळावर थांबवण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT