Jayant Patil  Sarkarnama
मुंबई

Jayant Patil News : जयंत पाटलांचं 'लिफ्ट पॉलिटिक्स'! आमदारांसोबत 'लिफ्ट'मधून फक्त प्रवास की मतांसाठी 'जॅक'?

Pradeep Pendhare

Mumbai News : विधान परिषद निवडणुकीसाठी मतदानाचा शेवटचा एक तास राहिला आहे. यातच सर्व पक्षांकडून आपापले उमेदवार विजयी होतील, असा दावा सुरू आहे. यातच शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांचे स्वतःकडे मत खेचून घेण्याची रणनीती चर्चेत आलीय. विधिमंडळातील त्यांचे 'लिफ्ट पॉलिटिक्स' चर्चेत आले आहे.

विधिमंडळात मतदार आमदार आल्यावर जयंत पाटील त्याच्याशी संवाद साधतात आणि संवाद साधतात. त्यानंतर त्याच्याबरोबर लिफ्ट संवाद साधत जातात. जयंत पाटील यांचा हा मतदार आमदाराबरोबर लिफ्टमधील प्रवास विधिमंडळाच्या चौथ्या मजल्यापर्यंत असतो. तिथे विधान परिषद निवडणुकीचे मतदान कक्ष आहे. सकाळपासून जयंत पाटलांचा लिफ्टमधील हा प्रवास अनेकदा झाला असून तो राजकीय चर्चेचा विषय बनला आहे.

शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील (Jayant Patil) महाविकास आघाडी कडून निवडणुकीच्या मैदानात आहे. शरद पवार यांचा त्यांना पाठिंबा आहे. या निवडणुकीच्या मैदानात अप्रत्यक्षपणे शरद पवार यांनी त्यांची जबाबदारी घेतली आहे. विधान परिषद निवडणूक सुरू होताच 'रेड झोन'मध्ये जयंत पाटील असल्याचे बोलले जात होते. तसा नरेटिव्ह सेट करण्यात आला होता. परंतु आज प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी जयंत पाटलांचे विधिमंडळातील 'लिफ्ट पॉलिटिक्स', चर्चेत आले आहे.

विधान परिषद निवडणुकीसाठी (Vidhan Patishad) प्रत्येक आमदाराचे मतदान महत्त्वाचे आहे 11 जागांसाठी 12 उमेदवार अर्ज आल्याने निवडणूक चुरशीचे होत आहे. कोणताही दगाफटका नको म्हणून प्रत्येक उमेदवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह विधिमंडळात तळ ठोकून आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील स्वतः एकटे आपली लढाई लढत आहेत. प्रत्येक मतदार आमदाराशी ते विधिमंडळाच्या पोर्चमध्ये भेटून संवाद साधत आहेत.

वेळप्रसंगी त्याच्याबरोबर मतदान कक्षाबरोबर लिफ्टमधून प्रवास करतात. त्यांचा हा लिफ्ट प्रवास मतदार आमदारांबरोबरचा अनेकदा झाल्याने ते चर्चेत आले आहेत. जयंत पाटील नियोजित मतांच्या कोट्यापेक्षा जास्त मताने निवडून येतील, अशी विरोधक देखील त्यांच्या मतदार आमदारबरोबरच्या लिफ्ट प्रवासावर टिप्पणी करत आहेत.

विधान परिषद निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर पाच वाजता मतमोजणी सुरू होईल. निवडणूक अधिकाऱ्यांनी मतमोजणीची तयारी सुरू केली आहे. बोटावर मोजण्या इतकेच मतदान राहिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT