Jitendra Awhad  Sarkarnama
मुंबई

Jitendra Awhad Expressed Fear: नुसता संशय आला तरी ९० दिवस जेलमध्ये राहावे लागणार; आव्हाडांनी कोणत्या कायद्याची व्यक्त केली भीती

Jitendra Awhad Expressed Fear Of New Law: राज्य सरकार किंवा पोलिसांना वाटलं तर आपण ९० दिवस जेलमध्ये राहणारच.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai Political News : केंद्र सरकारने अनेक जुन्या कायद्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजद्रोहाचा गुन्हा रद्द होणार आहे. तसेच महिला अत्याचार आणि मॉब लिचिंग अशा गुन्ह्यातही फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. मात्र, एका नव्या कायद्याबद्दल भीती व्यक्त करणारे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. सरकार किंवा पोलिसांना नुसता संशय आला तरी तुम्हाला आता ९० दिवस जेलमध्ये राहावे लागेल, असे त्यांनी त्यात म्हटले आहे. (Jitendra Awad expressed fear about the new law)

आमदार आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आतापर्यंत कुठल्याही गुन्ह्यासाठी जास्तीत-जास्त १४ दिवस पोलिस कोठडीमध्ये ठेवता येतं होतं. आता मात्र सरकारला कुठल्याही गुन्ह्यामध्ये, नुसता संशय जरी आला तरी तुम्हाला ३ महिने सरकारी कोठडीमध्ये काढावे लागतील. म्हणजे ९० दिवसांची सजा. काही करा अथवा नका करू. राज्य सरकार किंवा पोलिसांना वाटलं तर आपण ९० दिवस जेलमध्ये राहणारच. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच ही बातमी यावी, हे या देशाचं दुर्दैव आहे.

सगळे मिळवून म्हणूया...स्वतंत्र भारत चिरायू होवो! तोंडावर बोट ठेवूया.... महात्मा गांधीजींकडे बघूया....आणि हे लढले होते, असं फक्त मनातल्या मनात म्हणूया....!! कारण आपल्याला कोणाला लढायचचं नाही. स्वातंत्र्याची किंमत आपल्याला कुठे द्यावी लागली..? ती तर त्यांनी दिली. आपल्याकडे आयतं आलेलं स्वातंत्र्य आपण हातातून घालवतं आहोत. नवीन कायदे या देशाच्या मूळ ढाच्यालाच हात घालणार आहेत, असा इशाराही आव्हाड यांनी दिला आहे.

जितेंद्र आव्हाड आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, स्त्री असो वा पुरुष कधीही जेलमध्ये टाकून द्या आणि न्यायालयाला सांगा की, ‘ह्यांच्यावर संशय आहे.’ ९० दिवस त्याला जेलमध्ये ठेवण्याची पूर्णपणे तरतूद करुन ठेवली आहे. जागे व्हा... नाहीतर ९० दिवस जेलमध्ये बसा. यापैकी काय हवयं. स्वातंत्र्य की, ९० दिवस जेल. हे तुमचं तुम्ही ठरवा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT