Abhimanyu Pawar Become Minister : फडणवीसांच्या मर्जीतील अभिमन्यू पवार मंत्री होणार; भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचे सूतोवाच

BJP News : उपमुख्यमंत्री फडणवीस यांची आमदार अभिमन्यू पवार यांच्यावर कृपा आहे.
Abhimanyu Pawar-Devendra Fadnavis
Abhimanyu Pawar-Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Ausa News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील मराठवाड्यातील नाव म्हणजे औशाचे आमदार अभिमन्यू पवार. त्याच अभिमन्यू पवार यांच्याबाबत भाजपचे माजी आमदार तथा ज्येष्ठ नेते पाशा पटेल यांनी मोठे विधान केले आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांची आमदार अभिमन्यू पवार यांच्यावर कृपा आहे. त्यामुळे मंत्रिपदासाठी लातूर जिल्ह्याचा विचार झाल्यास पक्षश्रेष्ठींसमोर पवार यांच्याशिवाय दुसरे कोणाचेही नाव नसेल, असा दावा केला आहे. त्यामुळे पवार यांचे मंत्रिपद नक्की मानले जात आहे. (MLA Abhimanyu Pawar to become minister; Pasha Patel)

लातूर जिल्ह्याच्या औसा शहरातील मुस्लीमबहुल परिसरासाठी एक कोटी २० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याबद्दल आमदार पवार यांचा मुस्लीम बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्या सत्कार समारंभात माजी आमदार तथा राज्य कृषीमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी पवार यांच्या मंत्रिपदाबाबत भाष्य केले आहे.

Abhimanyu Pawar-Devendra Fadnavis
Narayan Rane Vs Vinayak Raut: कोण विनायक राऊत? काय त्यांची औकात?; राणेंनी उडवली खासदाराच्या उपोषणाची खिल्ली

अभिमन्यू पवार यांच्या उमेदवारीला भाजपमधीलच काही लोकांकडून विरोध झाला होता. तो विषय राज्यभर गाजला होता. त्यांना पराभूत करण्यासाठी टपून बसलेल्या विरोधकांना आमदार पवार पुरून उरले आणि विधानसभा निवडणुकीत दणदणीत २५ हजार मतांनी विजयी झाले. त्यांच्या या विजयात पाशा पटेल यांची भूमिका महत्वाची होती. तसेच, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचाही भरभक्कम पाठिंबा हेाता.

Abhimanyu Pawar-Devendra Fadnavis
kolhapur Maratha Reservation Meeting : अजितदादांसमोर कोल्हापुरात प्रचंड गदारोळ; मराठा आरक्षणाच्या बैठकीत बाचाबाची

मंत्रिपदासाठी लातूर जिल्ह्यातून अभिमन्यू पवारांशिवाय दुसरे नावच नाही, असे विधान करून पटेल यांनी माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना दुर्लक्षित करून आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. निलंगेकर हे आमदार पवारांना खिंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच आता पाशा पटेल यांनी पुढचा जिल्ह्यातील मंत्री म्हणून अभिमन्यू पवारांचे नाव घेणे निलंगेकरांना किती पचनी पडते, हे पाहावे लागेल. त्यावरच भाजपच्या जिल्ह्यातील राजकारणाची दिशा ठरणार असल्याची चर्चा रंगत आहे.

Abhimanyu Pawar-Devendra Fadnavis
Shiv Sena Election strategy : पवार काका-पुतण्याच्या भेटीने उद्धव ठाकरे सावध; लोकसभेसाठी स्वतंत्र रणनीती, उद्यापासून मॅरेथॉन बैठका

आमदार अभिमन्यू पवार आणि माजी मंत्री निलंगेकर यांच्यात कासारशिरशी अप्पर तहसील कार्यालयामुळे धुसफुस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पटेल यांचे हे वक्तव्य आल्याने राजकीय वर्तुळात पवारांच्या मंत्रिपदाचीच चर्चा सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com