Shrikant Shinde Reply Wadettiwar: वडेट्टीवारसाहेब, मुख्यमंत्र्यांची काळजी तुम्ही करू नका; तुम्ही तुमचा पक्ष सांभाळा : श्रीकांत शिंदेंचा टोला

Shivsena News: त्यांना गेल्या दीड वर्षापासून स्वप्नं पडत आहेत. पण, काहीच बदल होत नाही. मुख्यमंत्री जोमाने काम करत असून महाराष्ट्राला पुढे नेत आहेत.
Shrikant Shinde-Vijay Wadettiwar
Shrikant Shinde-Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Dombivli Political News: मुख्यमंत्र्यांची काळजी तुम्ही करू नका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सक्षम आहेत. विजय वडेट्टीवारसाहेब, तुम्ही तुमची लोकं सांभाळण्याकडे लक्ष द्या. स्वतःचा पक्ष मजबूत आणि मोठा करण्यासाठी काम करा, असे टोला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना लगावला.

आरोग्याचे कारण देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा घेऊन अजितदादांना मुख्यमंत्री करायचा प्रयत्न सुरू तर नाही ना, अशी शंका आहे, असे विधान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले होते. त्याला मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

खासदार शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडीत कोणी शिल्लक राहते की नाही, अशी परिस्थिती आहे. मुख्यमंत्री आज बदलतील, उद्या बदलतील, अशी त्यांना गेल्या दीड वर्षापासून स्वप्नं पडत आहेत. पण, काहीच बदल होत नाही. मुख्यमंत्री जोमाने काम करत असून महाराष्ट्राला पुढे नेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे डबल इंजिन सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे, ते पाहून अजित पवार हेही या सरकारमध्ये सामील झाले आहेत.

Shrikant Shinde-Vijay Wadettiwar
Abhimanyu Pawar Become Minister : फडणवीसांच्या मर्जीतील अभिमन्यू पवार मंत्री होणार; भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचे सूतोवाच

महाविकास आघाडीत आपल्यासोबत कोण राहतं की नाही, असा प्रश्न विरोधकांना पडलेला आहे. ज्या पक्षाचे विजय वडेट्टीवार नेतृत्व करतात, त्या पक्षाची आज काय अवस्था आहे. त्यांनी आपली लोक सांभाळण्याकडे लक्ष द्यावं. मुख्यमंत्री बदलतील, या मानसिकेतून त्यांनी बाहेर पडावं आणि आपला पक्ष कसा मजबूत होईल आणि वाढेल, यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्लाही श्रीकांत शिंदे यांनी वडेट्टीवार यांना दिला.

Shrikant Shinde-Vijay Wadettiwar
Shiv Sena Election strategy : पवार काका-पुतण्याच्या भेटीने उद्धव ठाकरे सावध; लोकसभेसाठी स्वतंत्र रणनीती, उद्यापासून मॅरेथॉन बैठका

ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सक्षम आहेत. त्यांची काळजी तुम्ही करू नका. ते राज्यातील गोरगरिब लोकांना न्याय देण्याचे काम करीत आहेत. आपण आपल्या पक्षाचा विचार गंभीरतेने करावा. याचवेळी शिंदे यांनी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या योजनांबद्दल माहिती दिली.

Shrikant Shinde-Vijay Wadettiwar
Narayan Rane Vs Vinayak Raut: कोण विनायक राऊत? काय त्यांची औकात?; राणेंनी उडवली खासदाराच्या उपोषणाची खिल्ली

स्वातंत्र्यदिनानिमित्त डोंबिवलीत १५० फूट उंचीच्या राष्ट्रध्वजाला वंदन करण्यात आले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी डोंबिवलीकरांनी भारत माता की जय अशा घोषणाही दिल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com