Jitendra Awhad Sarkarnama
मुंबई

Jitendra Awhad on SambhajiRaje : स्वराज्य संघटनेनं गाडी फोडल्यानंतर जितेंद्र आव्हाडांचा मोठा निर्णय; म्हणाले, 'यापुढे संभाजीराजेंना...'

NCP Vs Swarajya Sanghatna News : ठाण्यात गाडी फोडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे संतप्त झाले आहेत. त्यांनी आक्रमक पवित्रा घेत स्वराज्य संघटनेसह माजी खासदार संभाजीराजेंवरही टीकेची झोड उठवली आहे

Deepak Kulkarni

Mumbai News : माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला चढवला.ताफ्यातील पोलिसांची गाडी पाठीमागं असतानाही जीवाची पर्वा न करता हा हल्ला करण्यात आला.या हल्ल्याची जबाबदारीही स्वराज्य संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी स्वीकारली आहे.

यानंतर आता आमदार आव्हाड चांगलेच संतापले असून त्यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. यापुढे संभाजीराजेंना आता राजे म्हणणार नाही किंवा त्यांना अहो जाओ असा मानही देणार नसल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आधीच पेटलेला वाद आणखी भडकण्याची शक्यता आहे.

ठाण्यात गाडी फोडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे संतप्त झाले आहेत. त्यांनी आक्रमक पवित्रा घेत स्वराज्य संघटनेसह माजी खासदार संभाजीराजेंवरही टीकेची झोड उठवली आहे. ते म्हणाले,मी त्यांना छत्रपती संभाजी आणि राजे बोलत होतो.

मात्र,त्यांनी विशाळगडावर जी दंगल घडवली,त्यामुळे आता आपण त्यांना राजे म्हणणार नाही.आपण संभाजीराजेंना अहो जाओ असा मान देऊन बोलणार नाही.यापुढे मी तुम्हाला म्हणणार नाही, तुला म्हणेन असं जाहीर केले आहे.

आव्हाड म्हणाले,कारण ही लढाई विचारांची आहे.पण तुम्ही ज्या विचारांवर जात आहात ते शाहू महाराजांचे विचार नव्हते.हे तुमच्या वडिलांचे सुद्धा विचार नाहीत.मुलाने आपल्या वडिलांचे विचार खोडून टाकावं हे नजीकच्या इतिहासात कधी घडलं नाही.वडिलांनी तुमचा निषेध करणं हे बेदखल करण्यासारखं असल्याची जळजळीत टीका संभाजीराजेंवर केली आहे.

तसेच गाडीवर हल्ला झाल्यानंतर आव्हाडांनी संभाजीराजे छत्रपतींनी (Sambhajiraje Chhatrapati) दंगल घडवली आणि छत्रपती शिव-शाहूंच्या विचारांशी गद्दारी केल्याची टीकास्त्र डागले आहे. यावेळी त्यांनी माझ्या गाडीवर हल्ला करणारे तीन जण होते. पण माझ्याकडे चार पोलीस आणि त्यांच्याकडे चाळीस गोळ्या होत्या. मी याला हल्ला म्हणणार नाही. पण आपले वडील खासदार झाले ही त्यांच्या मनातली आग आहे असल्याचंही आव्हाड यावेळी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT