Jitendra Awhad Sarkarnama
मुंबई

Jitendra Awhad : हल्ल्यानंतर संतापलेल्या जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया; वक्तव्यावर ठाम, म्हणाले...

Attack On Jitendra Awhad Car : राजर्षी शाहू महाराजांचे रक्त सर्वांना बरोबर घेऊन जाणारे होते. जे लोक धर्माधर्मात, जातीजातीत भांडणे लावणारे कसे काय शाहू महाराजांचे वशंज असतील, असे स्पष्टीकरण आव्हाड यांनी दिले.

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : संभाजीराजे छत्रपती यांनी रक्त तपासून घ्यावे, या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या वाहनावर दगड, काठ्यांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्याची जबाबदारी स्वराज्य संघटनेने स्वीकारली आहे.

या हल्ल्यानंतर संतापलेले जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या विधानावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. तर हल्लेखोरांकडे माझे मी पाहून घेईन, त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. हा भ्याड हल्ला आहे, असे मतही आव्हाड यांनी व्यक्त केला.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, संभाजीराजे Sambhajiraje नाही, तर संभाजी. संभाजींची चूकच होती. विशाळगडावर जे काही झाले, ते त्यांच्या आड झाले. त्यांची भूमिका योग्य नव्हती. गडावरील घडलेल्या घटनेबाबत त्यांची भूमिका ही शाहू महाराजांच्या भूमिकेशी सुसंगत नव्हती, असेही ठामपणे आव्हाड यांनी यावेळी सांगितले.

संभीजीराजे छत्रपती यांनी रक्त तपासावे, या विधानावर आव्हाड यांनी आताही ठाम भूमिका मांडली. ते म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांचे रक्त जे होते ते सर्वांना बरोबर घेऊन जाणारे होते. भांडणे लावणारे त्यांचे रक्त नव्हते, असा माझ्या विधानाचा अर्थ आहे. आजही म्हणतो, राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा एक टक्काही विचार संभाजीराजेंमध्ये नाही. जाती-जातीमध्ये, धर्मा-धर्मांमध्ये जो भांडणे लावतो, तो कसा शाहू महाराजांचा वंशज असू शकतो, असेही आव्हाड म्हणाले.

आव्हाडांवरील हल्ल्याप्रकरणी तीन ते चार जणांना पोलिसांनी तब्यात घेतले आहे. त्यांच्यावर काय कारवाई करावी, असे वाटते. त्यावर आव्हडांनी, एका दगडासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत बोलणे योग्य नाही. माझ्या गाडीवर आजपर्यंत कुणीही दगड मारण्याची हिंमत नव्हती. ज्यांनी हल्ला केलेला आहे ना त्यांच्यावर माझी मी कारवाई करेन. त्यांना व्यवस्थित समाजावून सांगेन. मी पोलिसांकडे जाणार नाही, असेही आव्हाड Jitendra Awhad म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT