Kalidas Kolambkar Vs Shardhha Jadhav .jpg Sarkarnama
मुंबई

Kalidas Kolambkar Won 2024 Election : ठाकरेंना वडाळ्यात मोठा धक्का; भाजपच्या कालिदास कोळंबकरांनी विजय खेचून आणला

Kalidas Kolambkar Won Vadala Assembly Election 2024 final result live : वडाळा मतदारसंघाचे गणित म्हणजे कालिदास कोळंबकर ज्या पक्षात जातील तेथून ते निवडून येतील हे होते. कोळंबकर हे नारायण राणेंचे समर्थक मानले जात होते.

Deepak Kulkarni

Maharashtra Election Results 2024: महाविकास आघाडीला दुसरा धक्का बसला आहे. वडाळा मतदारसंघ कालिदास कोळंबकर (Kalidas Kolambkar) यांचा विजय झाल्याची माहिती समोर येत आहे.त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या श्रद्धा जाधव यांचा पराभव केला आहे. बाजह

वडाळा मतदारसंघाचे गणित म्हणजे कालिदास कोळंबकर ज्या पक्षात जातील तेथून ते निवडून येतील हे होते. यंदाच्या निवडणुकीत वडाळा मतदारसंघात महायुतीचे भाजप उमेदवार कालिदास कोळंबकर यांना 66 हजार 800 मतं मिळाली आहे. त्यांनी 24 हजार 973 मताधिक्क्याने विजय मिळवला आहे. त्यांनी 16 व्या फेरीचं मतदान तिथं पूर्ण झालं आहे.

कोळंबकर हे नारायण राणेंचे समर्थक मानले जात होते. ते राणेंसोबत शिवसेनेतून बाहेर पडले. 2009 आणि 2014 मध्ये कोळंबकर हे काँग्रेसकडून वडाळा मतदारसंघातून विजयी झाले. तर, 2019 मध्ये त्यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी भाजपकडून विजय मिळवला.

महाराष्ट्रातील निकालाची प्रत्येक घडामोड - येथे क्लिक करा...

2019 निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार शिवकुमार लाड होते. त्यांच्या विरोधात भाजपकडून कालिदास कोळंबकर होते. कोळंबकर यांनी तब्बत 30 हजारांच्या फरकाने लाड यांचा पराभव केला आहेत.

कालिदास कोळंबकर हे सलग नवव्यांदा विधानसभा निवडणुकीच्या मैदाना होते. त्यामुळे सलग नवव्यांदा ते विजय मिळवणार का याची उत्सुकता होती. कोळंबकर यांनी नेहमीच आपल्या विरोधी उमेदवाराला मोठ्या फरकाने पराजित केले होते.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल Latest Update

कालिदास कोळंबकर यांनी 2014 मध्ये काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि कमळाच्या तिकिटावर वडाळा मतदारसंघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी पुन्हा विजय मिळवला आणि 38,540 मते प्राप्त केली. त्यांचा जवळपास 37,740 मते मिळवणाऱ्या मिहिर कोटेचाविरुद्ध विजय झाला. या निवडणुकीत कोळंबकर यांच्या लोकप्रियतेचा ठसा असाच होता की, त्यांचा व्यक्तिगत प्रभाव पक्षाच्या पुढे होता.

विधानसभेच्या 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वडाळा मतदारसंघातून पुन्हा भाजपचे कालिदास कोळंबकर यांनी निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. यावेळी कोळंबकर यांनी 56,485 मतं मिळवली. त्यांनी काँग्रेसचे शिवकुमार उदय लाड यांना 25,640 मतांनी पराभव केला. कोळंबकर यांनी वडाळा मतदारसंघात भाजपचं वर्चस्व निर्माण केलं.

मलबारहिलमधून मंगल प्रभात लोढा यांची विजयाकडे वाटचाल असल्याचं दिसून येत आहे. 17 व्या फेरीअंती मंगल प्रभात लोढा यांना 55,550 मतांचं मताधिक्य मंगल प्रभात लोढा यांना 84,897 मतं तर ठाकरे गटाच्या भैरुलाल चौधरी यांना 29,347 मत मिळाली आहेत.कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी तब्बल 44 हजारांहून आधीची आघाडी घेतली आहे. यानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून फटाके फोडण्यात आले तसेच चंद्रकांत पाटलांना पेढे भरून अभिनंदन करण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT