uddhav thackeray group party worker Entry Eknath Shinde Group sarkarnama
मुंबई

Kalyan Loksabha Election : कल्याण मतदारसंघात ठाकरे गटाला झटका, उपजिल्हाप्रमुखाचा शिंदे गटात प्रवेश

Pankaj Rodekar

Kalyan Political News : कल्याण लोकसभेतील कल्याण ग्रामीण भागात ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला शिंदे गटाने झटका दिला आहे. कल्याण ग्रामीणमधील ठाकरे गटाचे uddhav thackeray group उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, राष्ट्रवादी पवार गटाच्या विधानसभा संघटक निला पाटील यांच्यासह आगरी समाजातील ज्येष्ठ समाजसेवक, आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे, २७ गाव संघर्ष समितीचे दत्ता वझे या सर्वांनी शेकडो पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या Eknath Shinde ठाणे निवासस्थानी हा प्रवेश पार पडला. गेल्या आठवडाभरात कल्याण लोकसभेत ठाकरे गटाला हा तिसरा मोठा झटका आहे. यापूर्वी डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर, महिला जिल्हा संघटक कविता गावंड, उपजिल्हाप्रमुख प्रकाश म्हात्रे, माजी नगरसेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कल्याण Kalyan ग्रामीण भागातले ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील हे गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत. मागील १० वर्षात कल्याण लोकसभेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या विकासकामांनी प्रभावित होऊन त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासह विभाग संघटक मधुकर शेळके, सुषमा ढोले, कैलास पाटील, उपविभाग प्रमुख प्रदीप चुडनाईक, शाखाप्रमुख गिरीश काळण यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विधानसभा संघटक निला पाटील यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत मधुरा खेडकर, सरिता वाघेरे आणि मोठ्या प्रमाणात महिला कार्यकर्त्या शिवसेनेत सामील झाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्यांचे शिवसेनेत स्वागत केले.

कल्याण ग्रामीण भागातील आगरी समाजातले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गुलाब वझे, २७ गाव संघर्ष समितीचे नेते आणि माजी सरपंच दत्ता वझे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. वझे यांचे आगरी समाजात उत्तम संघटन असून आगरी युथ फोरमच्या माध्यमातून आगरी महोत्सवासह विविध उपक्रम, आंदोलने, कार्यक्रम ते राबवत असतात. त्यांच्यासह माजी सरपंच अभिमन्यू म्हात्रे, बाळाराम ठाकूर, वर्गीस म्हात्रे, ज्ञानेश्वर माळी, महेश म्हात्रे यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला. वझे यांच्या प्रवेशामुळे ग्रामीण भागात शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मागील १० वर्षात कल्याण लोकसभेत मोठ्या प्रमाणात विकासकामे केली असून त्यांच्यावर विश्वास ठेवून आज मोठ्या ताकदीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेत येत आहेत. त्यामुळे शिवसेनेची ताकद वाढली असून श्रीकांत शिंदे हे विक्रमी मताधिक्याने विजयी होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले. तर शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून आज या सर्वांनी शिवसेनेत प्रवेश केला असून त्यांच्या प्रवेशामुळे निश्चितपणे कल्याण लोकसभेत शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT