Priyanka Chaturvedi : दावोसची 'गुलाबी थंडी' काढणाऱ्या शीतल म्हात्रेंना प्रियंका चतुर्वेदी यांनी दिलं जशास तसं प्रत्युत्तर; म्हणाल्या...

Shivsena Eknath Shinde: प्रियांका चतुर्वेदींनी श्रीकांत शिंदेंच नाव घेत आपल्या धारधार ट्विटर बाणांनी शीतल म्हात्रेंना घायळ केलं. 'गेल्या वर्षी दावोसमध्ये तुमच्या ठाणे रियासतीचे राजपुत्र कसे होते? ते कोणत्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेत होते?
Priyanka Chaturvedi
Priyanka ChaturvediSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Loksabha Election : 'गद्दार' शब्दावरून उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी चालवलेला बाण अचूक लागला. या बाणाने शिंदे गटातील Eknath Shinde Group नेते चांगलेच घायळ झाले. आणि प्रियांका चतुर्वेदींना उत्तर देयाला शिंदे गटातील दोन वाघीणी पुढे सरसावल्या. दावोसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केले,' असा बोचणारा प्रश्न विचारून चर्तुवेदींना घायाळ करण्याचा प्रयत्न शिंदे गटाच्या प्रवक्ते शीतल म्हात्रेंनी केला. त्यात वाघमारेंनीही चतुर्वेदींना झाप-झाप झापले. मात्र, उत्तराला प्रत्युत्तर देणाऱ्या प्रियांका चतुर्वेदींनी म्हात्रेंना 'मंदबुद्धी' म्हणत मोठा खुलासा करत हिशोब चुकता केला.

Priyanka Chaturvedi
Lok Sabha Election 2024: रत्नागिरी-सिंधुदुर्गात विनायक राऊतांची 'मशाल' पेटणार की राणेंचं 'कमळ' फुलणार? काय आहे कल...

'दावेसला गुलाबी थंडीत काय केले' असे म्हणणाऱ्या शीतल म्हात्रेंना प्रियांका चतुर्वेदींनी Priyanka Chaturvedi खोटारडी म्हटले आहे. मी कधीच दावोसला गेली नाही. गद्दार सेनेच्या या मुरब्बी महिलांनी हे सिद्ध केले आहे की त्या फक्त गद्दार नाहीत तर खोट्या आहेत.आता पुन्हा रडायला जा' असे म्हणत चतुर्वेदींनी खिल्ली उडवली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रियांका चतुर्वेदींनी श्रीकांत शिंदेंच नाव घेत आपल्या धारधार ट्विटर बाणांनी शीतल म्हात्रेंना sheetal mhatre घायळ केलं. 'गेल्या वर्षी दावोसमध्ये तुमच्या ठाणे रियासतीचे राजपुत्र कसे होते? ते कोणत्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेत होते? कदाचित परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते तपशील शेअर करु शकतील, असे म्हणत शीतल म्हात्रेंना बॅकफूटवर ढकलले.

काय म्हणाल्या होत्या शितल म्हात्रे

तुम्ही खासदार होण्यासाठी काय काय केले हे आम्हाला माहिती आहे. आम्हाला बोलायला लावू नका, खासदारकीची टर्म संपल्यावरची चतुरताईंची तडफड आता दिसू लागलीय… दावोसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलं? आणि मागच्या आठवड्यात परत खासदारही मिळवायला कुणा कुणाकडे लोटांगणं घातली ते सांगायला लावू नका... तुम्ही खासदार कशा झाल्यात हे सुद्धा आम्हाला माहीत आहे, असे शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी म्हटले होते.

Priyanka Chaturvedi
Uddhav Thackeray News : महाराष्ट्रात काँग्रेसच्या उमेदवारांसाठी ठाकरेंच्या सभांचा धडाका; राहुल गांधींपेक्षाही...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com