Kalyan No Water No Vote sarkarnama
मुंबई

No Water No Vote : ऐन निवडणुकीच्या काळात पाणीप्रश्न पेटला; मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा...

Kalyan Loksabha : काही दिवसांपूर्वी ठाणे मतदारसंघातील काही रहिवाशांनीदेखील पाण्याच्या समस्येमुळे मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला होता. वाढत्या उन्हामुळे कल्याण, ठाणे, पालघर जिल्ह्यांत पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

शर्मिला वाळुंज

Kalyan Loksabha : कल्याण लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार श्रीकांत शिंदे Shrikant Shinde विरुद्ध शिवसेनेच्या (ठाकरे गट) उमेदवार वैशाली दरेकर यांच्यात लढत होणार आहे. दोन गट एकमेकांना आव्हान देत आहेत. मात्र, पाण्याच्या समस्येने त्रासलेल्या मतदारांनी 'पाणी नाही तर मतदान नाही,' असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. कल्याण लोकसभेतील अंबरनाथमध्ये पाणीटंचाईने नागरिक त्रस्त झाले आहेत.

अंबरनाथ पूर्वेच्या कानसई विभागातील स्वामी देवप्रकाश गृहसंकुलात मागील अनेक महिन्यांपासून पाण्याची समस्या आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या रहिवाशांनी थेट आगामी निवडणुकांमध्ये (Election) मतदानावरच बहिष्कार टाकण्याचं निर्णय घेतला आहे. जवळपास सव्वाशे कुटुंब राहत असलेल्या या गृह संकुलात केवळ पिण्याचं पाणी अवघे 10 मिनीट येत असल्याची तक्रार रहिवाशांनी प्रशासनाकडे केली आहे. मात्र, तक्रारीची दखलच घेतली जात नसल्याने थेट मतदानावर बहिष्कार घालणार असल्याचा इशारा सोसायटीमधील रहिवाशांनी देत संताप व्यक्त केला आहे.

पाणी प्रश्नाबाबत स्वामी देवप्रकाश गृहसंकुलात नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिल्याने माजी नगरसेविका अपर्णा भोईर आणि मनसेचे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांनी या नागरिकांची समस्या जाणून घेत त्यांच्याशी चर्चा केली. प्रशासनाने जर लवकरच हा पाणी प्रश्न सोडवला नाही, तर उपोषण करणार असल्याचा इशारा अपर्णा भोईर यांनी दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काही दिवसांपूर्वी ठाणे मतदारसंघातील (Thane Loksabha constituency) काही रहिवाशांनीदेखील पाण्याच्या समस्येमुळे मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला होता. वाढत्या उन्हामुळे कल्याण, ठाणे, पालघर जिल्ह्यांत पाण्याच्या टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या कालावधीत मतदार नाराज होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त भागात प्रचार करताना उमेदवारांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

(Edited By Roshan More)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT