MP Shrikant Shinde Sarkarnama
मुंबई

Thane Politics : कल्याणचे खासदार ठाण्यात 'क्लीन बोल्ड' अजित पवार गटाच्या नेत्याने विकेट तर काढलीच, शिवाय...

Shivsena MP Shrikant Shinde : ...यावेळी खासदार शिंदेंनी षटकार-चौकारांची बरसात केली.

सरकारनामा ब्यूरो

पंकज रोडेकर-

Thane News : राज्याच्या राजकारणात कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे हे चौकार-षटकार मारत फटकेबाजी करताना दिसतात. त्यातच, शुक्रवारी ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे नव्याने बसविण्यात आलेल्या स्पोर्ट हायमास्टचे उद्घाटन करण्यासाठी खासदार शिंदे आले असताना नजीब मुल्ला ट्रॉफी 2024 या क्रिकेट स्पर्धेत खासदारांनी चौकार-षटकार मारले.

मात्र, अजित पवार गटाचे सरचिटणीस आणि स्पर्धेचे आयोजक नजीब मुल्ला (Najib Mulla) यांनी टाकलेल्या चेंडूवर खासदार त्रिफळाचित झाले. दरम्यान, खासदारांना आऊट करेल त्याला मुल्ला यांनी बक्षीस लावले होते. ते बक्षीस त्यांनी जिंकले, तर खासदारांनी आऊट झाल्यावर खिलाडूवृत्ती दाखवत हसत मुल्लांचे अभिनंदन केले.

ठाण्याचे भूषण असलेल्या दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहात खेळाडूंना अधिकाधिक सेवा-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी अनेक कामे हाती घेण्यात आली आहेत, याचाच एक भाग म्हणून स्पोर्ट लायटिंग अंतर्गत आंतरराष्ट्रीय दर्जाचे हायमास्ट बसविण्यात आले असून या हायमास्टचे उद्घाटन शुक्रवारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या हस्ते पार पडला, तर त्या स्टेडियम सध्या आयपीएलच्या धर्तीवर टेनिस क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत. याचदरम्यान, आयोजकांच्या आमंत्रणाला मान देत खासदारांनी मैदानात उतरून फलंदाजी केली. यावेळी खासदार अगदी खेळाडू झाले होते. त्यांनी बॅट हातात घेतल्यावर ग्रीपला रुमाल गुंडाळला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच मुल्ला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जवळपास अर्धा तास गोलंदाजी केली. खासदार चौकार आणि षटकार मारत चेंडू सीमारेषा पार करीत होते. दरम्यान, खासदार मैदानावर सेट झाल्याचे पाहून मुल्लांनी खासदारांची जो कोणी विकेट घेईल त्याला रोख बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा केली. कोणालाही त्यांची विकेट घेता येत नव्हती.

मात्र, मुल्ला यांनी टाकलेल्या चेंडूवर खासदार डॉ. शिंदे ठाण्यात त्रिफळाचित झाले. मैदान गाजवल्याचा आनंद खासदार शिंदे यांच्या चेहऱ्यावर पाहण्यास मिळाला होता, तर स्टेडियमवर सुरू असलेल्या क्रिकेटच्या सामन्यामधील खेळाडूंना खासदारांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगरसेवक विकास रेपाळे आदी उपस्थित होते.

(Edited By Deepak Kulkarni)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT