Thane News :
Thane News :Sarkarnama

Thane News : नजीब मुल्ला आमदारकीचे 'परफेक्ट मटेरियल' : म्हस्केंच्या वक्तव्याची ठाण्यात चर्चा!

Thane News : ठाण्यात राष्ट्रवादीला धक्का बसणार?
Published on

ठाणे : कळवा-मुंब्रा भागात नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा फलकावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो लावण्यात आले होते. त्यात नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी मुल्ला हे ज्येष्ठ व अभ्यासू नगरसेवक असून ते आमदारकीसाठी परफेक्ट मटेरियल असल्याचे मत वक्तव्य केले. त्यामुळे मुल्ला हे शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधान आले होते.

नरेश म्हस्केंच्या या दाव्यानंतर म्हस्केंसह शिंदे गटाचे पदाधिकारी आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी मुल्ला यांच्या वाढदिवसाला हजेरी लावली, यामुळे आता मुल्ला हे शिंदे गटात जाणार, हे स्पष्ट झाले असल्याच्या चर्चा अधिकच होऊ लागल्या आहेत.

Thane News :
Dombivali News : ठाकरे गटाच्या कार्यक्रमात पालिका आयुक्तांचा खोडा : अखेर न्यायालयात बाजी जिंकली!

नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसाला हजेरी लावत नरेश म्हस्के यांनी मुल्ला यांचे तोंडभरून कौतुक केले. त्यांचे कौतुक करीत असताना, शेरो-शायरी सादर करीत त्यांना अनोख्या शुभेच्छा दिल्या.यावेळी त्यांनी पुन्हा मुल्ला हे अभ्यासू आहेत, त्यामुळे त्यांनी आमदार व्हावे, अशी आमची इच्छा असल्याचे सांगितले. यामध्ये राष्ट्रवादीच्या उपस्थित कार्यकर्त्यांनीदेखील मुल्ला यांनी आमदार व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यामुळे एकप्रकारे मुल्ला यांनी शक्तिप्रदर्शन केल्याची चर्चा देखील आता सुरू झाली आहे

Thane News :
Narendra Modi News : मोदींच्या मुंबई दौऱ्यावरचा खर्च भाजपकडून वसूल करा : काँग्रेस नेत्याची मागणी!

यावर नजीब मुल्ला यांनी मात्र सावध प्रतिक्रिया यावेळी दिली. "आमचे सर्वच नेते मित्रमंडळी असून कोणी आमदारकीसाठी मला शुभेच्छा दिल्या तर त्याचा वेगळा अर्थ काढणे, ही राजकीय अपरिपक्वता असल्याचे मुल्ला यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com