Raju Patil, Shrikant Shinde Sarkarnama
मुंबई

Raju Patil : शिंदेंनी तडीपार केलेल्या भाजप नेत्याची मनसे आमदाराने घेतली भेट; शिंदे पिता-पुत्राचे राजकारण संपवण्याची वेळ... VIDEO पाहा

Kalyan Rural Assembly Constituency Election 2024: संदीप माळी माझा मित्र आहे. माझा नातेवाईक आहेत. प्रत्येक निवडणुकीत कोणी काही पक्ष बघत नाही. त्यांच्या गावात मी गेलो त्यांनी माझा सत्कार केला. याचा एवढा राग शिंदे पिता पुत्राला आला की रात्रभर पोलीस स्टेशनला त्याला बसवून ठेवलं.

शर्मिला वाळुंज

Dombivli News: कल्याण ग्रामीणमध्ये भाजपचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी यांना तडीपार करण्यात आले आहे. मनसेचे आमदार राजू पाटील यांचा प्रचार ते करत असल्याने ही कारवाई करण्यात आल्याची चर्चा आहे. यावर आता मनसे आमदार राजू पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

आमदार पाटील म्हणाले, काल गावात एक कार्यक्रम आयोजित केला होता. संदीप माळी माझा मित्र आहे. माझा नातेवाईक आहेत. प्रत्येक निवडणुकीत कोणी काही पक्ष बघत नाही. त्यांच्या गावात मी गेलो त्यांनी माझा सत्कार केला. याचा एवढा राग शिंदे पिता पुत्राला आला की रात्रभर पोलीस स्टेशनला त्याला बसवून ठेवलं. मी त्याला जाऊन भेटलो. तो म्हणाला, तडीपार केलं तर करू दे, तू बिनधास्त रहा.

राजकारण एका लिमिटच्या पुढे जाऊन वातावरण गढूळ करायचं काम शिंदे पिता-पुत्र करीत आहे. ते कुठे तरी संपवायची वेळ आलेली आहे, अशा शब्दांत आमदार पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाचे मुख्यमंत्री शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर टिका केली आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीतील बिघाडीचे चित्र पुन्हा एकदा दिसून आले आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघात भाजपचे पदाधिकारी मनसेला तर शिंदे गटाचे पदाधिकारी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला मदत करीत फिरत आहेत. त्यामुळे भाजपचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी यांना ठाणे जिल्ह्यातून ऐन निवडणकीच्या तोंडावर नोटीस धाडत तडीपार करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या या कारवाईमुळे भाजपाला घरचा आहेर मिळाला असल्याची चर्चा आता रंगली आहे.

कल्याणमधील भाजप पदाधिकारी संदीप माळी यांना बुधवारी मध्यरात्री तडीपारीची नोटीस देण्यात आली.आज दुपारी मानपाडा पोलिसांनी त्यांना ठाणे जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. माळी हे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय आहेत. सध्या ते मनसेचे उमेदवार राजू पाटील यांच्या प्रचारात सक्रिय आहेत.

बुधवारी मुख्यमंत्री शिंदे यांनी कल्याण ग्रामीण मतदारसंघात प्रचारसभा घेतली. सभेनंतर माळींना तडीपारची नोटीस मिळाली. यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली असून, "भाजप पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली जात आहे, तर दुसऱ्या पक्षातील कार्यकर्त्यांवरही अशीच कारवाई का केली जात नाही?" असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे संदीप माळी यांनीही या कारवाईवर प्रतिक्रिया देत शिंदे पिता-पुत्रावर संताप व्यक्त केला आहे.

ही वेळ तुमच्यावर येऊ शकते....

"मी रवींद्र चव्हाण यांचा कार्यकर्ता आहे. कोणाला घाबरणारा माणूस नाही. लोकसभेमध्ये आम्ही युतीधर्म पाळला आहे. कोणालाही दमदाटी केलेली नाही, त्रास दिलेला नाही. तरीसुद्धा फक्त राजू पाटील हे माझे मित्र आहेत. मैत्री केली तर किती त्रास झाला आहे पाहा.

मी आगरी समाजाला आवाहन करतो तसेच भाजपाचे कल्याण ग्रामीणचे जे पदाधिकारी आहेत त्यांना देखील आवाहन करतो. आज ही वेळ माझ्यावर आली, उद्या तुमच्यावर येऊ शकते. कारण लोकसभेमध्ये युतीधर्म पाळला त्याचे फळ मला मिळाले आहे. आता तरी जागे व्हा," असे संदीप माळी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT