Kolhapur News: पायाला भिंगरी लावून दोन वेळा आमदार केलं, त्या भावानं शब्द फिरवला! अर्चना पाटील भावूक

Radhanagari Bhudargarh Assembly election: माझ्या सासूबाईच्या पाया पडून 2024 ला ठेवायला आमदार करू, त्या आश्वासन दिले होते. पण त्यांनी दिलेला शब्द फिरवला असा शब्दात अर्चना पाटील यांनी समाचार घेतला आहे.
Radhanagari Bhudargarh Assembly election 2024
Radhanagari Bhudargarh Assembly election 2024Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातील लढत ही मेव्हण्या पाहुण्यांमधील असल्याने अधिक चुरशीची बनली आहे. मतदारसंघात तिरंगी लढत होत असताना दाजी ए वाय पाटील विरुद्ध मेव्हणे माजी आमदार के पी पाटील यांच्यात चांगलेच शाब्दीक युद्ध रंगले आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख उमेदवाराचे दावेदार असलेले ए वाय पाटील यांना ऐनवेळी उमेदवारी डावल्याने नाराज झालेल्या ए वाय पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला.

ठाकरेंच्या शिवसेनेकडून माजी आमदार के पी पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ए वाय पाटील आणि के पी पाटील हे मामेभाऊ आहेत. तर के पी पाटील यांची बहीण ही ए वाय पाटील यांची पत्नी आहे. के पी पाटील यांच्यासाठी दोन वेळा माघार घेतलेल्या ए वाय पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी देखील भावावर माजी आमदार के पी पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. माझ्या सासूबाईच्या पाया पडून 2024 ला ठेवायला आमदार करू, त्या आश्वासन दिले होते. पण त्यांनी दिलेला शब्द फिरवला असा शब्दात अर्चना पाटील यांनी समाचार घेतला आहे.

Radhanagari Bhudargarh Assembly election 2024
Kalyan Rural Vidhansbha Election: उमेदवारांमध्ये जुंपली! कल्याण ग्रामीणचे राजकीय वातावरण तापलं...

माझा भाऊ के पी पाटील यांच्यासाठी जीवाचे रान करून माझे पती ए वाय पाटील समाजकारण आणि राजकारणात राहिले. पायाला भिंगरी बांधून माझ्या भावाला दोन वेळा आमदार केले. 2014 ला जनतेने ए वाय पाटील साहेबांना निवडणुकीला उभे रहा असे सांगितले. रात्र के पी पाटील यांनी थांबायला सांगितले. माझ्या भावासाठी तुम्ही थांबा असे मी सांगितल्यानंतर ते थांबले असल्याचे अर्चना पाटील यांनी सांगितले.

Radhanagari Bhudargarh Assembly election 2024
Sharad Pawar: शरद पवारांनी पुण्यात डाव टाकला! मतदानाच्या सहा दिवसापूर्वीच भाजप नेते गळाला

2019 च्या निवडणुकीत हाच प्रकार झाला. त्यावेळी के पी पाटील यांनी आम्हाला सांगितले की यावेळी शेवटचे लढतो. 2024 ला आपण ए.वाय.ला उभा करू, त्यांना आमदार करू, असा शब्द के पी पाटील यांनी दिला. माझ्या सासूच्या पाया पडून त्यांनी आश्वासन दिले. स्वतः ते माझ्या घरी आले होते. त्यावेळी त्यांनी तो शब्द दिला होता.

माझ्या सासूबाईंची खूप इच्छा होती की माझ्या मुलाने आमदार व्हावे. मात्र 2024 ला देखील के पी पाटील निवडणुकीला उभारले आहेत. भावाने बहिणीला दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे माझ्या पतीने 2024 च्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे ठरवले. अशा शब्दात अर्चना पाटील यांनी बंधू माजी आमदार के पी पाटील यांचा समाचार घेतला आहे.

माझ्या भावाने मला दिलेला शब्द पाळला नाही. माझ्या पतीने त्यांच्यासाठी तालुका सांभाळला. बहिणीचा शब्द पाळला नाही त्याला काय म्हणावे? असेही अर्चना पाटील म्हणाल्या.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com