Kalyan Rural Vidhansbha Election: उमेदवारांमध्ये जुंपली! कल्याण ग्रामीणचे राजकीय वातावरण तापलं...

Political tensions escalate as candidates clash in Kalyan Rural constituency: एक उमेदवार 2 वाजता उठतो, एकाला दहा वर्षानंतर मतदारसंघाची आठवण झाली, दोन वॉर्डच्या पुढे ते कधी सरकले नाहीत, त्यांची फॉर्च्युनर गाडी आल्यावर फेरीवाले का पळतात...
kalyan rural vidhansbha election 2024
kalyan rural vidhansbha election 2024 Sarkarnama
Published on
Updated on

Dombivli News: कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने उमेदवार देताच येथील लढतीला एक वेगळीच रंगत आली आहे. मनसेचे आमदार राजू पाटील, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी आमदार सुभाष भोईर व शिवसेनेचे डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. विधानसभा निवडणूक प्रचारास सहा दिवस शिल्लक असताना कल्याण ग्रामीणमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. मनसे, दोन्ही शिवसेना उमेदवार एकमेकांवर पलटवार करीत आहेत.

बुधवारी कल्याण ग्रामीण मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेश मोरे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलताना उमेदवार मोरे यांनी विरोधी उमेदवार राजू पाटील व सुभाष भोईर यांचे नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टिका केली.

kalyan rural vidhansbha election 2024
Sharad Pawar: शरद पवारांनी पुण्यात डाव टाकला! मतदानाच्या सहा दिवसापूर्वीच भाजप नेते गळाला

एक उमेदवार 2 वाजता उठतो, एकाला दहा वर्षानंतर मतदारसंघाची आठवण झाली असे म्हणत शिवसेनेने मनसे व ठाकरेंच्या उमेदवाराना टोला हाणला आहे. यावर दोन वॉर्ड च्या पुढे ते कधी सरकले नाहीत असे ठाकरेंच्या तर त्यांची फॉर्च्युनर गाडी आल्यावर फेरीवाले का पळतात ते सांगा असे मनसेने म्हणत उलट सवाल केला आहे. आता ही लढाई पुढे कशी रंगते ते पाहावे लागेल.

शिंदे गटाचे उमेदवार मोरे म्हणाले, कुठे शेठगिरी करायची नाही, कुठे भाईगिरी करायची नाही. आपल्याला माहीत आहे समोरचे दोन्ही उमेदवार बलाढ्य आहेत. एक उमेदवार 2 वाजता उठतो, एक उमेदवार त्याला दहा वर्षांपूर्वी आपण निवडून दिला होता. त्याला दहा वर्षांनंतर या मतदारसंघाची आठवण झाली. एक उमेदवार आता भेटीगाठी घेत आहे. आपण शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी,रिपाईचे कार्यकर्ते आहोत दिवस रात्र लोकांच्या सेवेत असतो, असे ते म्हणाले.

kalyan rural vidhansbha election 2024
Bhokardan Assembly Election: धक्कादायक : शरद पवार यांच्या उमेदवारावर दगडफेक; मराठवाड्यात नेमंक काय घडलं?

मनसेचे उमेदवार विद्यमान आमदार राजू पाटील म्हणाले, "कोणामध्ये किती नंबरची लढाई सुरू आहे हे मला माहीत नाही. मात्र एक सांगतो तुम्ही दोनला उठा नाहीतर सातला उठा. लोकांची कामे झाल्याशी मतलब आहे. आणि हे काय बघायला आले होते का ? आम्ही कधी उठतो. ते लवकर उठून उर्सेकर वाडीत फॉर्च्युनर गाडी घेऊन जातात. यांची गाडी बघून फेरीवाले पळतात त्याचे उत्तर द्या, अशा शब्दांत पलटवार केला आहे. यावर आता शिवसेनेकडून काय उत्तर येते हे पाहावे लागेल.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार, माजी आमदार सुभाष भोईर म्हणाले, "राजेश मोरे गेल्या अनेक वर्षांपासून या महापालिकेमध्ये काम करतात. ते दोन वॉर्डच्या पुढे कधी सरकलेच नाही. मी आमदार असताना मोरे माझ्या पाठीमागे फिरत होते. वेगवेगळ्या माध्यमातून माझ्याकडे निधी मागत यायचे. आणि आज ते सांगतात सुभाष भोईर गेले दहा वर्षे कुठे होते. मी पाच वर्षच याठिकाणी आमदार होतो.माझ्या नादी लागू नका, मी खूप पुढे सरकलो आहे असा टोला भोईर यांनी मोरे यांना लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com