Mumbai News : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. येथे मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांच्यापुढे शिवसेना व शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उमेदवारांचे आव्हान आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण ग्रामीण हा एक विधानसभा मतदारसंघ आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विजयात कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मनसेची मते निर्णय ठरली होती. या मतांच्या जोरावरच खासदार शिंदे यांना विजय प्राप्त करता आला होता.
त्यावेळी केलेल्या मैत्रीची परतफेड म्हणून माझ्या मतदारसंघातील कामे करून द्या, त्यासाठी निधी पास करा अशी मागणी त्यावेळी आमदार पाटलांनी केली होती. त्यावर खासदार शिंदे यांनी देखील त्यांना सकारात्मक पाठिंबा दिला होता. पण त्याची परतफेड शिंदे करणार का हे निकालानंतरच समजेल.
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून उमेदवार देण्यात आला त्याचे काही नाही. माझ्या मतदारसंघात काम करून देऊ असे आश्वासन दिले होते. मात्र नंतर माझी कामे तशीच असून इतरांची कामे पुढे सरकताना दिसली. तेव्हाच समजलो यांच्या नियतमध्ये खोट आहे. त्याप्रमाणे घडलं असा टोला मनसे आमदार पाटील यांनी खासदार शिंदे यांना अप्रत्यक्षपणे लगावला आहे. आता खासदार शिंदे हे पाटलांची नाराजी कशी दूर करतात हे पाहावे लागेल. दुखावलेल्या मनसे आमदाराची आता खासदार डॉ.शिंदे कशी समजूत काढतात हे पाहावे लागेल.
दिवा येथे राजू पाटील यांच्या निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी करण्यात आले. यावेळी दिव्यात मनसेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना मनसे आमदार पाटील यांनी खासदार शिंदे यांना अप्रत्यक्षपणे टोला हाणला.
विधानसभा निवडणुका लागताच महायुतीमधील शिवसेना येथे उमेदवार देणार नाही अशी आशा मनसैनिकांना होती. मात्र येथून शिवसेनेने उमेदवार देत आपली ताकद अजमावण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेकडून डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मोरे हे खासदार शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. याविषयी आमदार पाटील यांना विचारले असता त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.