PM Modi Speech Dhule: महाविकास आघाडीमध्ये ड्रायव्हरसीटसाठी स्पर्धा सुरु; मोदींचा धुळ्यात हल्लाबोल

PM Modi Public Address Dhule: महाराष्ट्रातून मला खूप काही मिळाले. पुढच्या पाच वर्षात महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेले जाईल,महायुती आहे तर गती आहे.प्रगती आहे, असे मोदी म्हणाले.
PM Modi
PM ModiSarkarnama
Published on
Updated on

PM Modi in Dhule: विधानसभा निवडणुकीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली सभा धुळ्यात झाली. आपल्या भाषणाची सुरवात मोदींनी मराठीतून केली. धुळेकरांना 'रामराम'करीत मोदींनी आई एकवीरादेवींला वंदन केले. "महाराष्ट्रातून मला खूप काही मिळाले. पुढच्या पाच वर्षात महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेले जाईल,महायुती आहे तर गती आहे.प्रगती आहे, असे मोदी म्हणाले.

महाविकास आघाडीवर मोदींनी टीका केली. जनतेला लुटण्याचे काम आघाडी सरकारने केले. अनेक योजनांमध्ये आघाडी सरकारने भष्ट्राचार केला. अडीच वर्ष आघाडी सरकारने जनतेची लूट केली. महाविकास आघाडीच्या गाडीला चाक नाही, ब्रेक नाही, ड्रायव्हरसीटवर बसण्यासाठी त्यांच्यात स्पर्धा सुरु आहे, असा टोला मोदींना लगावला.

मागील अडीच वर्षात महाराष्ट्राला महायुतीने महाराष्ट्राला जी गती मिळाली आहे ती थांबणार नाही. महाविकास आघाडीच्या गाडीला ना चाक आहेत, ना बसायला सीट आहे. लोकांना लुटणारे महाविकास आघाडीत येतात ते विकास थांबवितात. महाआघाडीने जनतेची लुटमार केली. मेट्रो, समृध्दी महामार्ग होण्यात अडचणी निर्माण केल्या. काँग्रेसचे जाती-जातीमध्ये वाद निर्माण केला, असे मोदी म्हणाले.

PM Modi
Sharad Pawar: पुत्राच्या विजयासाठी माजी आमदारानं सोडली शरद पवारांची साथ! भाजपचा प्रचार करणार

महायुती सरकारने महाराष्ट्राच्या प्रगतीचे अनेक रेकॉर्ड केले. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस,अजित पवार यांनी महायुतीचे वचननामा केला आहे. हा वचननामा महाराष्ट्राला विकसीत करेल, जनतेच्या सुचनेवरुन महायुतीने वचननामा बनविला आहे. महिलांसाठी योजना केल्या, पण काँग्रेसने त्यांची थट्टी केली. लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी काँग्रेस षडयंत्र करीत आहे, असा आरोप मोदींनी केला.

PM Modi
Pune Election: मुख्यमंत्र्यांची सभा, अजितदादांचा मेळावा तर सुप्रियाताईंची रॅली; पुण्यात सभांचा धुरळा

नरेंद्र मोदी म्हणाले, "परकीय गुंतवणुकीमुळे महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. वाढवण विमानतळाच्या मागणीचा विचार विधानसभा निवडणुकीनंतर करणार," असे मोदी म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विमानतळाची मागणी केली होती.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची मागणी अनेक दशकापासून होती. परंतु मराठीला अभिजात भाषेचा दर्जा वर्षानुवर्ष सत्तेवर असलेल्या काँग्रेसने दिला नाही. आमच्या सरकारला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यामुळे काँग्रेसला धक्का बसला आहे. मोदी यांनी हे काम कसे केले, हा प्रश्न काँग्रेसला पडला आहे. महाराष्ट्रातील डबल इंजिन सरकार जोरदार काम करीत आहे. यामुळे गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र पहिली पसंत राहिली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com