PM Modi Birthday sarkarnama
मुंबई

PM Modi Birthday : कंगना म्हणाली, मोदींजी, तुम्ही राम-कृष्णासारखे अमर आहात !

PM Modi Birthday : देशाच्या इतिहासाच्या पानात तुमचे नाव सदैव लिहिले जाईल. तुम्ही सर्वांचे लाडके आहात.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा आज (शनिवार) 72 वा वाढदिवस. यानिमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. अभिनेत्री कंगना राणावत (kangana ranaut) हीने मोदींना खास शुभेच्छा दिल्या आहेत.

कंगना राणावत सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. मोदींच्या वाढदिवसानिमित्त तिनं टि्वटवर तिच्या भावना शेअर केल्या आहेत.

कंगनाने २०१८ मधील एका कार्यक्रमातील फोटो शेअर केला आहे.मोदींसोबतचा जुना फोटो शेअर करीत कंगनाने मोदींना वाढदिवसानिमित्त सविस्तर शुभेच्छा दिल्या आहेत.

कंगनाने पंतप्रधान मोदींना पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली व्यक्ती संबोधले आहे.'पंतप्रधान मोदी हे भगवान राम आणि कृष्णासारखे अमर आहेत,' असे कंगनाने टि्वटमध्ये म्हटलं आहे. तिच्या या शुभेच्छाची चर्चा सध्या समाजमाध्यमांवर रंगली आहे.

कंगना टि्वटमध्ये म्हणते..

"माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. लहानपणी रेल्वे प्लॅटफॉर्मवर चहा विकण्यापासून ते पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली व्यक्ती बनण्यापर्यंतचा प्रवास अविश्वसनीय आहे. मी तुम्हाला दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देते, तुम्ही राम, कृष्ण, गांधींसारखे अमर आहात. या देशाच्या इतिहासाच्या पानात तुमचे नाव सदैव लिहिले जाईल. तुम्ही सर्वांचे लाडके आहात. तुमचा वारसा कोणीही पुसून टाकू शकत नाही, म्हणूनच मी तुम्हाला अवतार मानते,"

यापूर्वीही एका कार्यक्रमात कंगनाने मोदीचं कौतुक केलं होते. "मी मोदीजींच्या सक्सेस स्टोरीमुळे त्यांची खूप मोठी फॅन आहे," असे कंगना म्हणाली होती.

नरेंद्र मोदी यांच्या जन्म १७ सप्टेंबर १९५० मध्ये एका सर्वसामान्य घरात झाला. पण जिद्द आणि चिकाटीमुळे आज ते भारताचे पंतप्रधान आहेत. वयाच्या 51 व्या वर्षी, मोदी आमदार होण्यापूर्वीच गुजरातचे 14 वे मुख्यमंत्री बनले.

मोदींच्या वाढदिवसा निमित्ताने देशभर भाजपकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे. दिल्लीतल्या एका हॉटेलने पंतप्रधान मोदींचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजकरा करण्याचं ठरवलं आहे. तर तामिळनाडूमध्ये सोन्याची नाणी वाटण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT