Kapil Patil on Kisan Kathore Sarkarnama
मुंबई

Kapil Patil on Kisan Kathore : 'हिंमत असेल तर अपक्ष लढून दाखवा, मग..' ; कपिल पाटलांचं किसन कथोरेंना आव्हान?

Kapil Patil and Kisan Kathore dispute : या लोकसभा निवडणुकीत कपिल पाटील यांचा पराभव झाला होता. या पराभवाचं खापर कपिल पाटील यांनी आमदार किसन कथोरे यांच्यावर फोडलं होतं.

शर्मिला वाळुंज

Murbad News : 'काही जणांना वाटतं, की आम्ही आहोत म्हणून भाजप आहे, पण तुमची इतकी ताकद असेल, हिंमत असेल तर अपक्ष लढून दाखवा. मग होईल दूध का दूध, पानी का पानी', असं म्हणत भाजपाचे माजी खासदार कपिल पाटील यांनी त्यांच्याच पक्षाचे मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांना नाव न घेता आव्हान दिलं आहे.

मुरबाड विधानसभेचे भाजपाचे(BJP) आमदार किसन कथोरे आणि माजी खासदार कपिल पाटील यांच्यात मागील अनेक वर्षांपासून वितुष्ट असून त्यातूनच ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कपिल पाटील यांनी मुरबाडमध्ये निष्ठावंतांचा मेळावा घेत गटबाजीचं उघडपणे प्रदर्शन केल्याचं दिसत आहे. याच मेळाव्यात त्यांनी कथोरे यांना हे आव्हान दिलं.

यापूर्वी लोकसभा निवडणुकीत कपिल पाटील यांचा पराभव झाला होता. या पराभवाचं खापर कपिल पाटील यांनी आमदार किसन कथोरे(Kisan Kathore) यांच्यावर फोडलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर किसन कथोरे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न कपिल पाटील गटाकडून केला जात असल्याचं बोललं जात आहे.

बारवी धरणाचे प्रकल्पग्रस्त नोकरीसाठी ८ वर्ष वणवण करत होते, मात्र माझ्याकडे ते आल्यानंतर ८ महिन्यात त्यांना नोकऱ्या मिळवून दिल्या. तसंच आज जी भूमिपूजनं केली जात आहेत, त्यातली अनेक कामं मी केली असून सध्या फक्त श्रेय घेण्याचं काम सुरू असल्याची टीका कपिल पाटील(Kapil Patil) यांनी कथोरे यांच्यावर नाव न घेता केली. तसंच सध्या सुरू असलेली भूमिपूजनं पाहता मागील ८ वर्षात न झालेली सगळी कामं आत्ताच होत आहेत का? असा टोलाही त्यांनी लगावला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT