Dhananjay Munde, Walmik Karad, Karuna Munde Sarkarnama
मुंबई

Karuna Munde : "कलेक्टर, पोलिस अन् धनंजय मुंडेंसमोर कराडने बाथरुमला येईपर्यंत मारलं, ते CCTV..." करुणा मुंडेंचा गंभीर आरोप

Karuna Munde allegations : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड असा आरोप होत असलेला आणि सध्या तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडवर करुणा (शर्मा) मुंडे यांनी गंभीर आरोप केला आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 21 Feb : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड असा आरोप होत असलेला आणि सध्या तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडवर करुणा शर्मा मुंडे (Karuna Munde) यांनी गंभीर आरोप केला आहे. वाल्मिक कराडने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी धनंजय मुंडे आणि चक्क पोलिसांसमोर आपणाला बाथरूमला येईपर्यंत मारहाण केल्याचा खळबळजनक आरोप करूणा मुंडे यांनी केला आहे.

करुणा मुंडे यांनी गुरुवारी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान नेमकी काय चर्चा झाली याबाबतची माहिती सांगताना त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, "धनंजय मुंडे यांनी पुण्यातील ज्या लोकांची जमीन खाल्ली आहे, त्यांना घेऊन मी सुप्रिया सुळेंकडे गेले होते. यावेळी त्यांनी या सगळ्याचा पाठपुरावा करण्याचं आणि मला मदत करण्याचं आश्वासन दिलं."

तर, माझ्या गाडीत रिव्हॉल्व्हर ठेवली गेली, पोलिसांचा गैरवापर करत मला तीन वर्षे तुरुंगात टाकायचा प्रयत्न केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. शिवाय काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात ज्या वाल्मिक कराडने (Walmik Karad) मला बाथरुमला येईपर्यंत मारलं होतं.

तो आता तुरुंगात सडतोय आणि तो आयुष्यभर तुरुंगातच सडेल. तो एक दोन पैशांची किंमत नसलेला गुंड आहे. त्याने मला मारुन 8 महिनेही झाले नसतील तोपर्यंत तो जेलमध्ये गेला. त्याच्यासोबत लवकरच धनंजय मुंडेही (Dhananjay Munde) तुरुंगात जातील, असा दावा यावेळी करूणा मुंडेंनी केला.

करूणा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?

जिल्हाधिकारी कार्यालयात डीपीडीसीची (DPDC) मिटींग होती. तिथे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे उपस्थित होते. यावेळी पोलिसांसमोर वाल्मिक कराडने मला कपड्यांमध्ये बाथरुमला येईपर्यंत मारहाण केली. मी जिल्हाधिकारी कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याचा प्रयत्न केला. पण धनंजय मुंडेंनी पोलिसांचा वापर करुन मला ते मिळू दिले नाहीत, असा आरोप करुणा मुंडे यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT