Ladki Bahini Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यावर होणार उद्यापासून 1500 रुपये जमा; अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता

Women financial aid scheme News : फेब्रुवारीचा हप्ता वेळेवर मिळणार असून यासाठी अर्थ विभागाकडून 3490 कोटी रुपये वर्ग केले आहेत. दरम्यान, फेब्रुवारीत अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे.
CM Fadnavis on Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुका डोळयांसमोर ठेवून 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' ही महत्त्वाकांक्षी योजना राबवली होती. या योजनेच्या अंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजाराचा लाभ दिला जातो. या योजनेच्या जोरावर महायुती सरकार राज्यात सत्तेवर आले आहे. त्यानंतर आता फेब्रुवारीचा हप्ता वेळेवर मिळणार असून शुक्रवारपासून हप्ता खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे. यासाठी अर्थ विभागाकडून 3490 कोटी रुपये वर्ग केले आहेत. दरम्यान, यावेळी जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीत अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसापासून महिलांकडून लाडक्या बहिणींचा फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार? असा सवाल उपस्थित केला जात होता. पण आता उद्यापासूनच लाडकी बहिण योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. डिसेंबर अखेर 2 कोटी 46 लाख महिला लाभार्थी होत्या. त्यातील ५ लाख महिला अपात्र झाल्यानंतर जानेवारीअखेर 2 कोटी 41 लाख लाभार्थी महिला होत्या. मात्र, अद्याप फेब्रुवारी अखेरची आकडेवारी आलेली नाही. मात्र, त्यातही अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

CM Fadnavis on Ladki Bahin Yojana
Dharashiv Shivsena : धाराशिवमध्ये पाऊल ठेवताच पालकमंत्री सरनाईकांचे मोठे विधान; म्हणाले, 'दोनवेळा जाळ्यात अडकलेला वाघ..'

9 लाख महिलांची कमी करण्यात येणार?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कमी केलेल्या महिलांची संख्या 9 लाख होणार आहे. यापूर्वी 5 लाख महिलांची नावे कमी करण्यात आली होती. आता नव्याने 4 लाख महिलांची संख्या कमी होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या 945 कोटी रुपयांची बचत होणार आहे.

CM Fadnavis on Ladki Bahin Yojana
NCP leaders U-turn : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या नेत्यांचा 48 तासांतच यू टर्न? 'या' नेत्यावर केले गंभीर आरोप

या योजनेतील महिलांना वगळले जाणार

नमो शेतकरी योजनेचा लाभ आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणा-या 5 लाख महिला आहेत. या महिलांना लाडकी बहिण योजनेतील फक्त 500 रुपये मिळणार तर नमो शेतकरी योजनेतून 1000 रुपये मिळणार आहेत.

दिव्यांग विभागातून लाभ मिळणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळलं जाणार आहे.वाहनं असलेल्या अडीच लाख महिला आहेत त्यांना ही यातून वगळण्यात आलं आहे. सोबतच निकषात न बसणा-या अनेक महिला आहेत त्यांनी ही पैसे परत करायला सुरुवात केली आहे.

CM Fadnavis on Ladki Bahin Yojana
Shiv Sena News: ठाकरे सेनेच्या डॅमेज कंट्रोलसाठी तात्या लागले कामाला! इच्छुकांच्या मुलाखती...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com