Maharashtra doctor assault case today: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रुग्णालयात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नगरसेवकाची दादागिरी समोर आली होती. नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी येथे रुग्णालयात घुसून डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण केली. विरोधकांनीदेखील यावरून सरकारला धारेवर धरले.
त्यानंतर अखेर विष्णूनगर पोलिसांनी म्हात्रे यांना बेड्या ठोकल्या. मात्र, आता अचानक म्हात्रेंची प्रकृती खालावली असून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना हृदयाचा त्रास होत असल्याने आयसीयूमध्ये दाखल केल्याची माहिती मिळत आहे.
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात एका गर्भवती महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, तिच्यावर उपचार सुरू असताना डॉक्टरांनी बाळाची प्रकृती लक्षात घेता त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर फोन करणाऱ्या रमेश म्हात्रे यांचा फोन रुग्णालयातील डॉक्टरांनी उचलला नाही.
या क्षुल्लक कारणावरून संतापलेल्या म्हात्रे यांनी आपल्या समर्थकांसह थेट रुग्णालयात घुसून तेथे उपस्थित असलेल्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण केली. यानंतर वैद्यकीय क्षेत्रासह राजकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली. तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करत म्हात्रे यांच्यासह त्यांच्या समर्थकांना अटक करण्याची मागणी केली.
अखेर म्हात्रे यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. दरम्यान, तेथे तपासणीदरम्यान त्यांची प्रकृती अचानक खालावली.
त्यांना हृदयाचा त्रास होत असल्याचे समोर येताच त्यांना तातडीने ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. हृदयाचा त्रास होत असल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मात्र, ज्या रुग्णालयात त्यांनी गोंधळ घातला, त्या केडीएमसीच्या रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळेच आज म्हात्रे यांच्यावर ठाणे सिव्हिल रुग्णालयात उपचार घेण्याची वेळ आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.