Ajit Pawar News :  Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar News : अजित पवारांच्या कार्यालयासाठी दिलेल्या बंगल्याच्या चाव्या मिळेना; कार्यकर्त्यांनी कुलूपच तोडलं!

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप घडविल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP Crisis) पक्षातून बंड करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकार मध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर दादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि निवडणूक चिन्हावर देखील दावा केला आहे.

अजित पवार (AJit Pawar) यांनी आज त्यांच्या पक्षाचे कार्यालय मंत्रालयासमोर मंत्र्यांच्या बंगल्यात सुरू करणार आहे. मात्र सर्व नेते पोहोचले तरी बंगल्याची चाव्या मिळत नसल्याने सर्व नेत्यांना बंगल्याबाहेरच ताटकाळत उभं राहण्याची वेळ आली होती, त्यानंतर कार्यकर्त्यांकडून कुलूप तोडून बंगल्यात प्रवेश केला आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रवादी पक्षातून फुटून अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवार यांनी त्यांच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या काल केल्या आहेत. त्यानंतर अजित पवार गटाचे कार्यालय म्हणून A-5 क्रमांकाचा बंगला ते वापरणार होते, पण ऐनवेळी या बंगल्याच्या चाव्या कुणाकडे आहेत? याची कल्पना कुणालाच नसल्याने नेत्यांची मोठी धावपळ सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या गटाचे नेते शिवाजीराव गर्जे, युवक काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांची शोधाशोध सुरू झाली असून, ऐनवेळी बंगला ताब्यात न मिळाल्याने मोठी पंचाईत झाली आहे. या नव्या कार्यालयाचे अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार होते. तर आजपासून अजित पवार गट या बंगल्याचा पक्षाचे कार्यालय म्हणून वापर करणार होते.

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार आज शिंदे फडणवीस सरकार मधील पहिल्या कॅबिनेट बैठकीला मंत्रालयात हजर झाले आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाल्यानंतर या अजित पवार नवीन पक्ष कार्यालयाचे उद्घाटन करणार आहे. या पक्ष कार्यालयाच्या उद्घाटना वेळी कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल मंत्री छगन भुजबळ, मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह सर्व मंत्री उपस्थित राहणार आहे. या नवीन पक्ष कार्यालयाच्या समोर अजित दादा पवार यांच्या समर्थनात असलेल्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे.

अजित पवार गटाकडून आज पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून जितेंद्र आव्हाड यांना अपात्र करण्याचा आणि जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून पदमुक्त निर्णय घेण्यात आला आहे. तर शरद पवार गटाने पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना निलंबीत करण्यात आले आहे.

अजित पवार गटाने आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी, अजित पवार यांची विधीमंडळ नेते पदी आणि अनिल पाटील यांची प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर पक्षातील इतर पदांवरील नियुक्त्यांचे सर्व अधिकार हे तटकरे यांना देण्यात आले आहेत.

अजित पवार यांनी काल राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील. हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. मात्र, आमदारांनी शपथ घेतल्यानंतर त्यांच्याकडे कोणतं पद जाणार? अजित पवार यांना कोणतं खातं मिळणार? अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांना भाजपकडील खाते मिळणार की शिंदे गटाच्या खात्यांनाही कात्री बसणार? अशी चर्चा सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT