Rashtrawadi News: फांद्या कुठेही जावो आम्ही मूळ आणि खोड यांच्याशी नाते तोडणार नाही, कार्यकर्त्यांचा निर्धार...

Praful Patel News: चंद्रपूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना गळाला लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.
Ajit Pawar, Sharad Pawear and Rajendra Vaidya
Ajit Pawar, Sharad Pawear and Rajendra VaidyaSarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar News : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाने चंद्रपूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना गळाला लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. विदर्भाची जबाबदारी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. (The responsibility of Vidarbha has been entrusted to MP Praful Patel)

पटेल यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संपर्क केला आणि मुंबई येथील अजित पवारांच्या बैठकीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. फांद्या कुठेही जावो आम्ही मूळ आणि खोड यांच्याशी नाते तोडणार नाही, अशा शब्दांत पटेल यांना राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांना सुनावले. आम्ही मोठ्या साहेबांसोबत एकनिष्ठ आहोत, असे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी (ता. २ जुलै) राजभवनात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांना मंत्रिपदाचे बक्षीस मिळाले. राष्ट्रवादीचा एक गट अजित पवार यांच्या नेतृत्वात भाजपसोबत गेला. शिवसेने नंतर एका वर्षात राष्ट्रवादीत सुद्धा फूट पडली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.

शिंदे गटाप्रमाणे अजित पवार यांनी पक्षच ताब्यात घेण्याचा निर्धार केला आहे. नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांची नियुक्ती केली. पक्षावर ताबा मिळविण्यासाठी भविष्यात मोठी कायदेशीर लढाई लढावी लागणार आहे. त्यामुळे राज्यभरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी आपल्या सोबत रहावे, यासाठी अजित पवार गटाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

Ajit Pawar, Sharad Pawear and Rajendra Vaidya
Ajit Pawar News in Marathi : राष्ट्रवादीच्या कार्यालयात उद्या बैठक, मात्र शहराध्यक्ष ‘प्रतिसाद देत नाहीत’ !

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवारसुद्धा परिस्थिती हाताळण्यासाठी मैदानात उतरले आहेत. यासाठी दोन्ही गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली. दोन्ही गटांची उद्या ५ जुलैला मुंबईला बैठक आहे. या बैठकीला उपस्थित रहावे, यासाठी पदाधिकाऱ्यांशी दोन्ही गटाकडून संपर्क साधला जात आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांना रविवारी रात्री राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचा दूरध्वनी आला. लढू आणि जिंकू विचलित होऊ नका, असा धीर पवार यांनी दिल्याचे वैद्य यांनी सांगितले. त्यानंतर खासदार प्रफुल्ल पटेल आणि आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनीही वैद्य आणि जिल्ह्यातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला.

Ajit Pawar, Sharad Pawear and Rajendra Vaidya
Ajit Pawar Live News : 'हा' खेळ शरद पवारांनीच सुरू केला होता; बावनकुळेंचा घणाघात!

५ जुलै अजित पवार यांच्या बैठकीला उपस्थित होण्याचे निमंत्रण दिले. मात्र सर्वच पदाधिकाऱ्यांनी पटेल यांना नकार दिला. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर यांनीही अजित पवार गटातील नेत्यांनी आपल्याशी संपर्क साधल्याचे सांगितले. परंतु आपण मोठ्या साहेबांसोबतच राहणार, असे भटारकर यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस शहर अध्यक्ष राजीव कक्कड, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष बेबी उईके यांनीही शरद पवारांची साथ सोडणार नाही, असे सांगितले.

चंद्रपूर (Chandrapur) शहर महानगर पालिकेतील राष्ट्रवादीचे (NCP) दोन माजी नगरसेवक मंगला आखरे आणि दीपक जयस्वालसुद्धा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबतच राहणार आहे. मुंबई येथे आयोजित ५ तारखेच्या शरद पवार यांना आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी जिल्ह्यातील पदाधिकारी आज (ता. ४) मुंबईला रवाना होणार आहेत. फूट पडल्यानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी शरद पवार यांच्याच बाजूने भक्कमपणे उभे असल्याचे चित्र तूर्तास बघायला मिळत आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com