Kirit Somaiya Sanjay Raut Uddhav Thackeray  sarkarnama
मुंबई

Kirit Somaiya : 'संजय राऊत, उद्धव ठाकरे यांच्यात हिम्मत असेल तर...' , कोर्टाचा निकाल येताच किरीट सोमय्यांचे चॅलेंज

Kirit Somaiya Sanjay Raut Uddhav Thackeray : मेधा सोमय्या म्हणाल्या, आमचा न्यायालयावर विश्वास होता तो या निकालाने अधिक दृढ झाला आहे. बेताल वक्तव करणार असाल तर सहन करणार नाही, हेच दाखवण्याचा मी प्रयत्न केला.

Roshan More

Kirit Somaiya News : मेधा किरीट सोमय्या यांनी शिवसेना (यूबीटी) संजय राऊत यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. या खटल्याचा निकाल दंडाधिकारी माझगाव महानगर न्यायालायने संजय राऊत यांना दोषी ठरवले. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी विधानसभेच्या आधी आपल्याला तुरुंगात टाकायचा डाव आहे, असा आरोप केला.

संजय राऊत यांनी केलेल्या आरोपाला किरीट सोमय्या यांनी प्रतिआव्हान दिले आहे. 'संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी हायकोर्टात जावे आणि तेथे हेच सांगावे की निवडणुकीच्या आधी मला तुरुंगात टाकण्याचा डाव आहे.', असे सोमय्या म्हणाले.

'हे फक्त इथे बोलत आहेत यातील एकही शब्द त्यांच्या अपिलमध्ये नसेल. आरती कुलकर्णी यांच्या न्यायालयाने संजय राऊतला दोषी ठरवले आहे. तो आरती कुलकर्णी यांच्यावर संशय व्यक्त करत आहे. हा न्यायालयाचा अपमान आहे. खरचं त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी हायकोर्टात जावे', असे आवाहन किरीट सोमय्या यांनी दिले.

मेधा सोमय्या म्हणाल्या, देवाच्या रुपाने न्यायालयाने त्यांनी शिक्षा केली. आमचा न्यायालयावर विश्वास होता तो या निकालाने अधिक दृढ झाला आहे. बेताल वक्तव करणार असाल तर सहन करणार नाही, हेच दाखवण्याचा मी प्रयत्न केला.जी संस्था मुलाप्रमाणे वाढवली त्यावर कोणी डाग लागत असेल तर त्याला समोरे जाईल.

आमच्या विरोधात 27 तक्रारी

संजय राऊत याने फेब्रुवारी 2022 पासून आमच्यावर 27 तक्रारी, आरोप केले होते.एकाचाही कागदपत्रे दाखवले नाही. त्यामुळे एक प्रकरण घेऊन आम्ही न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. आमच्या संस्थेने 100 कोटी लाटले, असा आरोप केला होता. पण तो कोर्टात एक कागदही देऊ शकले नाही, असे सोमय्या म्हणाले.

संजय राऊतांना काय शिक्षा?

अब्रुनुकसानीचा खटल्यात दंडाधिकारी माझगाव महानगर न्यायालायने संजय राऊत यांना दोषी ठरवले. राऊत यांना 15 दिवसांचा कारवास तसेच 25 हजारांचा दंडाची शिक्षा न्यायालयाने केली. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, ज्या काही त्रुटी खालच्या न्यायालयात राहिल्या असतील त्या वरील न्यायालयात दूर केल्या जातील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT