Mumbai Political News : भाजप नेते किरीट सोमय्यांना ५० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. ५० लाख रुपये दिले नाही तर त्यांच्यासंबंधित व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही सोमय्यांना दिली आहे. या प्रकरणी त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली असून खंडणीखोरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Political News)
ऋषिकेश शुल्का नावाच्या व्यक्तिने सोमय्यांना ई मेल पाठवून खंडणी मागितली आहे. यानंतर त्यांनी मुलुंडमधील नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. आरोपीचा शोध घेऊन या प्रकरणाचा लवकरच छडा लावू, असे पोलिसांनी सांगितले आहे. (Maharashtra Political News)
दरम्यान, काही दिवसांप्रकरणी किरीट सोमय्यांचा (Kirit Somaiya) एक आक्षेपार्ह्य व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठवली होती. पावसाळी अधिवेशनातही त्या व्हिडिओचे पडसाद उपमटले होते. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवेंनी त्यांच्याकडे आठ जीबीचा डेटा असल्याचा खळबळजनक दावा केला होता.
यापूर्वीचा सोमय्यांचा व्हिडिओप्रकरण लिक केल्याप्रकरणी संबंधित वृत्तवाहिनीवर ७२ तासांची बंदी घालण्यात आली होती. ही बंदी दिल्ली उच्च न्यायालयाने तत्काळ हटवली असली तरी भाजपवर सर्व स्तरातून टीका होऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर सोमय्यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी मिळाली आहे. शुक्ला नावाच्या आरोपीने ईमेल करून सोमय्यांकडे ५० लाखांची खंडणी मागितली आहे. मात्र सोमय्यांनी वेळीच पोलिसांकडे धाव घेतली आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.