Kirit Somaiya Sanjay Raut Uddhav Thackeray  sarkarnama
मुंबई

Somaiya Vs Thackeray : किरीट सोमय्यांच्या मुलाच्या विरोधात कट्टर शिवसैनिक मैदानात, उद्धव ठाकरेंनी चक्र फिरवली! बिनविरोध निघाला फुसका बार!

Neil Somaiya Vs Dinesh Jadhav : किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या विरोधात कट्टर शिवसैनिक मैदानात उतरला आहे. बिनविरोध निवडणुकीत करण्याचे भाजपचे प्रयत्न ठाकरेंनी उधळून लावले.

Roshan More

BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीत किरीट सोमय्या यांचे पुत्र निल सोमय्या हे भाजपचे उमेदवार आहेत. मुलंड वाॅर्ड 107 मधून उमेदवार होते. या वाॅर्डमध्ये ठाकरे यांचे अधिकृत उमेदवार नव्हते. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला देण्यात आली होती. मात्र, या पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात आला.

राजकीय पक्षाच्या कोणताही उमेदवार नील सोमय्यांच्या विरोधात नसल्याने त्यांचा सहज विजय होईल, असे चित्र होते. मात्र, उद्धव ठाकरेंनी चक्र फिरवत अपक्ष म्हणून मैदानात उतरलेल्या कट्टर शिवसैनिक दिनेश जाधव यांना पाठींबा दिला आहे. जाधव हे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुरस्कृत अपक्ष उमेदवार असणार आहेत.

संजय राऊत यांनी सांगितले की, किरीट सोमय्या हा महाराष्ट्र विरोधी आहे. मुंलुंडचा **डा पोपटाला बिनविरोध म्हणून नाचायला लागलाय.ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुटली होती. मात्र, आमचा कडवट शिवसैनिक दिनेश जाधव याने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अजुनही त्याचा अर्ज कायम आहे. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी एक पत्र दिले आहे. या पत्रात दिनेश जाधव हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुरस्कृत उमेदवार आहे.

नाईलाजाने पवारांना ती जागा सोडली...

संजय राऊतांनी सांगितले की, ती जागा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने वाॅर्ड 107 साठी आग्रह केला. आमच्याकडे देखील या जागेवर चांगले उमेदवार होते. सगळे मिळून ही जागा जिंकू असे ठरवून ती जागा पवारांच्या राष्ट्रवादीला देण्यात आली. मात्र, आम्ही ठरवलं होतं की सर्वांनी मिळून तेथील उमेदवाराच्या मागे उभं राहायचं पण तेथे देखील बिनविरोधचा घोटाळा झाला. मात्र, आमच्या कट्टर शिवसैनिकाने अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. त्याला आम्ही पुरस्कृत केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT