Kirit Somaiya, Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Kirit Somaiya Viral Video Update : किरीट सोमय्यांच्या 'व्हायरल व्हिडिओ'चा विषय उद्धव ठाकरेंनी एका वाक्यातच संपवला; म्हणाले..

Uddhav Thackeray On Maharashtra Government : राज्यात सत्तेसाठी साठमारी सुरू

सरकारनामा ब्यूरो

Uddhav Thackeray On Kirit Somaiya : भाजप देशात हुकूमशाहीला पोषक असे वातावरण निर्मिती करत आहे. सध्या देशात सत्तेसाठी साठमारी सुरू आहे. एकापाठोपाठ एक पक्ष सर्रासपणे फोडले जात आहेत. याविरोधात देशातील देशप्रेमी, लोकशाहीप्रेमी पक्ष एकत्र आले आहेत, असे म्हणत शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली. तर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कथित 'व्हिडिओ'प्रकरणी जास्त न बोलत राज्य सरकारला उपरोधक टोला लगावला. (Latest Political News)

बंगळूरुतील 'इंडिया'च्या बैठकीनंतर आज बुधवारी (ता. १९) उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात हजेरी लावली. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. ठाकरे म्हणाले, बंगळूरूत दोन दिवस लोकशाहीप्रेमी, देशप्रेमी पक्षांची बैठक झाली. लोकशाहीप्रेमी पक्षांची आघाडी झाली आहे. त्या आघाडीचे नाव 'इंडिया' असे आहे. ही लढाई कुणाविरुद्ध नसून हुकूमशाहीविरुद्ध आहे. पंतप्रधान येतात-जातात, मुख्यमंत्री येतात-जातात मात्र देशातील लोकाशाही वाचली पाहिजे. या हेतूनेच आम्ही सर्व एकत्र आलो आहोत."

राज्यात सुरू असलेली सत्तेची साठमारी मतदार पाहत आहेत. ते सत्ताधाऱ्यांना धडा शिकवतील, असा सूचक इशाराही यावेळी ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस-पवार यांना दिला आहे. ठाकरे म्हणाले की, "अजित पवारांवर आरोप करून शिवसेना फुटली होती. आता अजित पवारच राज्य सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे खरे कोण आणि खोटे कोण हे लोकांना समजले आहे. हा डोळे नसलेला धृतराष्ट्र नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे."

यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या 'व्हायरल व्हिडिओ'प्रकरणी छेडले असता ठाकरे यांनी एका वाक्यातच विषय संपवला. तसेच राज्य सरकारने याबाबत योग्य निर्णय घेईन, असा टोलाही लगावला. उद्धव ठाकरे म्हणाले, "मी असे किळसवाणे आणि बिभत्स 'व्हिडिओ' पाहत नाही. या 'व्हिडिओ'प्रकरणी मात्र राज्यातील माता-भगिनींनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यांच्या भावनांची कदर राज्य सरकारने केली पाहिजे."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT