Kishori Pednekar
Kishori Pednekar  Sarkarnama
मुंबई

'शिवसेनेचे मुंबई महापालिकेत 'मिशन 150'!'

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुंबई महापालिकेवर (Mumbai Municipal Corporation) भाजपचा (BJP) झेंडा फडकवण्यासाठी भाजपाकडून सर्वतोपरी तयारी केली जात असतनाच दुसरीकडे या निवडणुकीत शिवसेना (ShivSena) 150 जागांवर निवडूण येणार, असा दावा मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी केला आहे.

पेडणेकर एक वृत्त वाहिनीशी बोलत होत्या. राज्यात सध्या सुरु असलेल्या राजकारणाला मुंबई महापालिकेची किनार असल्याचेही त्यांनी सांगितले. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सर्वकाही सुरु आहे, असा आरोप त्यांनी केला. मुंबई महापालिकेवर गेल्या 25 वर्षापासून शिवसेनेचे वर्चस्व आहे. मात्र, हेच मोडीत काढण्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.

भाजपकडून मोठ्या प्रमाणात ताकद लावली जात आहे. असे असले तरी महापालिकेवर शिवसेनेचा भगवाच कायम राहणार असा दावा केला जात आहे. पेडणेकर यांनी यंदाच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या जागांमध्ये वाढ होऊन हा आकडा 150 असेल असे सांगितले आहे.

मनसेच्या भूमिकेबाबत बोलताना पेडणेकर म्हणाल्या, राज ठाकरे हे उद्या कोणाच्याही व्यासपीठावर दिसतील. याबाबत नवखे असे काही नाही. ते फक्त शिवसेना व उद्धव ठाकरे आहेत त्या व्यासपीठावर जाणार नाहीत, असा टोला पेडणेकर यांनी लगावला. मनसेला कोणती विचारधाराच राहिलेली नाही, हेच स्पष्ट होते असेही पेडणेकर म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT