Tejas Thackeray, Kishori Pednekar sarkarnama
मुंबई

तेजस ठाकरेंची राजकारणात होणार ग्रॅण्ड एन्ट्री; पेडणेकरांचे सूचक विधान

किशोरी पेडणेकर यांनी केलेल्या विधानामुळे तेजस ठाकरे प्रकाशझोतात आले आहेत

सरकारनामा ब्यूरो

Tejas Thackeray : मुंबई : शिवसेना (ShivSena) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे धाकटे चिरंजीव तेजस राजकारणात येणार आहेत, अशी चर्चा अनेक दिवसांपासून रंगली आहे. या संदर्भात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी आज प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

पेडणेकर मुंबईमध्ये बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या, तेजस ठाकरे हे ओजस्वी आहेत. तेजस हे नाव कधी राजकारणात आले तर ते ओजस्वी रितीने काम करतील. तेजस ठाकरेंची राजकारणामध्ये ग्रँड एंट्री होणार, असेही पेडणेकर यांनी सांगितले.

तेजस ठाकरेंच्या राजकारणातील प्रवेशाबाबत गेल्या कित्येक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहेत. मात्र, अजून त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला नाही. आता पेडणेकरांनी याबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तेजस प्रकाशझोतात आले आहेत. तेजस हे विविध देशांतील जंगलांमध्ये प्राण्यांवर तसेच जैव विविधतेवर संशोधन करत आहेत. आता ते राजकारणात उतरतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

पेडणेकर म्हणाल्या, तेजसची ओळखच वेगळी आहे. खेकड्यांना कसे वटणीवर आणायचे हे त्यांना चांगले माहित आहे. वेगवेगळ्या खेकड्यांना त्यांनी तेजस खेकडा, ठाकरे खेकडा अशी नावे दिली आहे. ते राजकारणात एंट्री करतील का नाही याबाबत त्यांचे वडिल आमचे पक्षप्रमुख सांगु शकतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना मोठे खिंडार पडले आहे. शिवसेनेला सावरण्यासाठी तेजस ठाकरे यांच्या राजकीय लाँचिंगकडे सर्वांचे लक्ष आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेजस शिवसेनेत सक्रिय होऊ शकतात, असे सांगितले जात आहे. तेजस यांच्याविषयी बाळासाहेबांनी केलेले एका विधानाची चांगलीच चर्चा होते असते. बाळासाहेब म्हणाले होते, 'उद्धवचा नंबर दोनचा मुलगा सेम माझ्यासारखा आहे. त्याच्या आवडीनिवडी ही माझ्याशी जुळतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT