अशोक चव्हाण पहिल्या रांगेत; भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेला ब्रेक?

अशोक चव्हाण भाजपमध्ये (BJP) जाणार असल्याची चर्चा रंगली होती
Ashok chavan News
Ashok chavan News Sarkarnama
Published on
Updated on

Ashok Chavan : नवी दिल्ली : काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती. आज काँग्रेसच्या हल्लाबोल रॅलीला दिल्लीमधून सुरुवात झाली. या कार्यक्रमात चव्हाण मंचावर पहिल्या रांगेत दिसले. यामुळे भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेला ब्रेक लागल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण यांची भेट झाल्याचीही चर्चा रंगली होती. मात्र, या दोन्ही नेत्यांनी ही भेट नाकारली होती. चव्हाण हे मंचावर महिल्या रांगेत दिल्यामुळे आता तरी चव्हाण भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना ब्रेक लागेल का?

Ashok chavan News
Rahul Gandhi| रामलीला मैदानावरुन राहुल गांधींनी फुंकले रणशिंग

अशोक चव्हाण हे काँग्रेसच्या १० आमदारांसह भाजपमध्ये जाणार अशी चर्चा रंगली होती. मात्र, यावर बोलताना चव्हाण म्हणाले होते, 'मी पुढील आठवड्यात भारत जोडो यात्रेसाठी दिल्लीला जाणार आहे. भाजपमध्ये जाणार असल्याच्या संपूर्ण चर्चांना कोणतेही अर्थ नाही. या चर्चा पूर्णपणे तत्थहिन आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

Ashok chavan News
देश टिकवायचा असेल तर...; राहुल गांधींचे विरोधी पक्षांना मोठे आवाहन

'हल्ला बोल' रॅलीच्या माध्यमातून काँग्रेस देशातील महागाईविरोधात एकजुटीने हल्ला करण्याच्या तयारीत आहे. दिल्लीत काँग्रेसच्या 'हल्ला बोल' रॅलीनंतर 'भारत जोडो यात्रा' सुरू होणार आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 135 दिवसांची काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून सुरू होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com