Ravindra Chavan addresses the media after controversy sparked by Mayor Kripashankar Singh’s statement.  sarkarnama
मुंबई

BJP Damage Control : '...तर उत्तर भारतीय महापौर असेल', कृपाशंकर सिंहांच्या वक्तव्यानंतर रवींद्र चव्हाणांकडून डॅमेज कंट्रोल, सगळे पत्ते ओपन केले!

Kripashankar Singh Ravindra Chavan : कृपाशंकर सिंग यांनी उत्तर भारतीय महापौर बनेल, असे वक्तव्य केले होते. त्यावर आता रवींद्र चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

सरकारनामा ब्यूरो

प्रकाश लिमये

Ravindra Chavan News : भाजप नेते कृपाशंकर सिंग यांनी येवढे उमेदवार निवडून आणू की मीरा भाईंदरचा महापौर हा उत्तर भारतीय बनू शकेल, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले होते. उत्तर भारतीय विरुद्ध मराठी असा मु्द्दा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून बनवण्यात येत होता.

कृपाशंकर सिंग यांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, मीरा भाईंदरचा महापौर भारतीय जनता पक्षाचा असेल व त्याची निवड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील प्रदेश पातळीवरील समिती घेईल.

महापालिका निवडनुकीनिमित्त भाजपकडून मिरा रोड येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी खासदार गोपाळ शेटी, आमदार नरेंद्र मेहता उपस्थित होते.

प्रत्येकजण आपल्या मनातील भूमिका सांगत असतो मात्र मिरा भाईंदरमध्ये भाजपचा महापौर असेल ही पक्षाची भूमिका आहे. राज्यात सर्व महापालिकांमध्ये महायुतीचा महपौर असेल तर मिरा भाईंदरमध्ये भाजपचा महापौर असेल. निवडणुक झाली की महापौर पदासाठी इच्छूक असलेल्यांची नावे प्रदेशाकडे येतील त्यानंतर प्रदेश पातळीवरील पक्षाची समिती त्यावर निर्णय घेईल असे चव्हाण यांनी सांगितले.

कार्यकर्ते समजुतदार

ठिकठिकाणी झालेल्या बंडखोरीवर बोलताना रविंद्र चव्हाण म्हणाले की राज्यात २९ महापालिकांमध्ये भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने निवडणुक लढण्यास इच्छूक होते. कार्यकर्त्यांना न्याय देण्याची पक्षाची नेहमीच भूमिका राहिलेली आहे. जागा मर्यादित असल्याने काही चांगल्या कार्यकर्त्यांना देखील संधी देणे कठीण होते. मात्र पक्षाचे कार्यकर्ते समजूतदार आहेत.

बंडोबांना थंडोबा करण्यासाठी प्रयत्न

स्थानिक पातळीवरील जिल्हा समिती व राज्यस्तरीय समिती ज्याठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली आहेत त्यांनी उमेदवारी मागे घेण्यासाठी व त्यांची समजूत काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या संधी देता येणे शक्य आहे असे त्यांना सांगण्याचा प्रयत्न पक्षाकडून केला जात आहे अशी माहिती चव्हाण यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT