Mumbai News : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या एका व्हिडीओवरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. मुंबई पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल केला आहे. त्याला समन्सही बजावण्यात आले आहे. कालच त्याने आपण माफी मागणार नसल्याचे जाहीर केले होते. आता त्याने पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला डिवचले आहे.
कुणाल कामराच्या शोधात मुंबई पोलिस आहे. तो तमिळनाडूमध्ये असल्याची चर्चा आहे. यापार्श्वभूमीवर त्याने पुन्हा एकदा एका गाण्याचा नवा व्हिडीओ ट्विट करत आपल्या विरोधकांना ललकारलं आहे. ‘हम होंगे कामयाब...’ या गीताच्या चालीवर त्याने ‘हम होंगे कंगाल...’ असे त्याने गायलेले गीत पोस्ट केले आहे. विकसित भारताचे गीत, असे नाव त्याने दिले आहे.
‘हम होंगे कंगाल...’ या गीतामध्ये कामराच्या स्टुडिओमध्ये झालेल्या तोडफोडीचे फोटो, व्हिडीओ दाखवण्यात आले आहे. शिवसेनेचे नेते राहुल कनाल यांचाही फोटो दाखवण्यात आला आहे. गीतामध्ये चोहोबाजूने दंगे, पोलिसांचे पंगे, नथूराम गोडसे, आसाराम, बेरोजगारी हे मुद्दे घेत निशाणा साधला. एकप्रकारे कामराने शिवसेनेला डिवचल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, कामराने सोमवारी रात्री आपली भूमिका स्पष्ट करत माफी मागणार नसल्याचे जाहीर केले होते. त्याने म्हटले होते की, माझं बोलणं आणि कृती यावरही कोणाचंही नियंत्रण नाही. एका विनोदी कलाकाराच्या शब्दावरून एखाद्या ठिकाणावर हल्ला करणे, तितकेच मूर्खपणाचे आहे. तुम्हाला दिलेले बटर चिकन आवडले नाही म्हणून टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक उलटवण्याचाच हा एक प्रकार आहे.
कोणी मला धडा शिकवण्याच्या धमक्यांना मी भीक घालत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा अधिकार असून तो कोणा एका श्रीमंतांकडे किंवा राजकारण्यांचा नाही. मी कायद्याच्या विरोधात काहीही वागलेलो नाही. त्यामुळे मी माफी मागणार नाही. मी जे म्हटलं तेच नेमकं अजित पवार एकनाथ शिंदेंबद्दल बोललं होते, असे कामराने म्हटले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.